ठाणे : महिलांबाबत खळबळजनक विधान केल्याप्रकरणी पतंजली फेम, योग गुरू रामदेव बाबा हे चांगलेच चर्चेत आले आहेत. महिलांच्या साडी आणि कपडे यावर विधान केल्यानंतर महिलांमधील या संपूर्ण वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. ठाण्यातील काँग्रेस पदाधिकारी महिलांकडून (Women office bearers of Congress) आज रामदेव बाबा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी महिलांनी रामदेव बाबाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी (protested against Ramdev Baba today) केली. Protested Against Ramdev Baba
यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव शिल्पा सोनोन यांच्या मार्गदरशनाखाली, महिलांनी रामदेव बाबांचा निषेध केला. महिलांकडून रामदेव बाबा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच रामदेव बाबा यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेला काळं फासून, जोडे मारून महिलांनी आपला निषेध नोंदवला.
रामदेव बाबा यांनी केलेल्या वक्तव्या वेळी त्या ठिकाणी मंचावर उपमुख्मंत्री यांच्या पत्नी अमृता फडणवीस या उपस्थित होत्या. खरतर त्यांनी या वक्तव्याचा निषेध करणे गरजेचे होते. मात्र त्यांनी देखील याचा विरोध केला नाही. त्यामुळे या रामदेव बाबा यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या महिला सचिव शिल्पा सोनोने यांच्याकडून करण्यात आली आहे. Protested Against Ramdev Baba