ETV Bharat / state

आश्चर्य! उद्यान एक्स्प्रेस अंगावरून जाऊनही महिला जिवंत... - baldalapur railway station news

बदलापूर रेल्वेस्थानकात उद्यान एक्सप्रेस अचानक थांबल्याने जीआरपी व आरपीएफ कर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता एक महिला डाऊन ट्रॅकवर मिळून आली. ही उद्यान एक्स्प्रेस तिच्या अंगावरुन गेल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. मात्र या घटनेत महिलेला कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही.

women alive even after passing the express on her body
आश्चर्य! उद्यान एक्स्प्रेस अंगावरून जाऊनही महिला जिवंत...
author img

By

Published : Jun 17, 2021, 9:33 PM IST

ठाणे - एका ३५ वर्षीय महिलेच्या अंगावरून भरधाव वेगात उद्यान एक्स्प्रेस जाऊनही ती महिला जिवंत असल्याची घटना बदलापूर ते अंबरनाथ रेल्वे स्थानकादरम्यान घडली आहे. या घटनेत महिलेला कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. लोहमार्ग पोलिसांनी तिच्या घराचा पत्ता शोधून तिला तिच्या आईच्या ताब्यात दिले आहे. श्रुती विशाल माळवे (रा. मालप्लाझा सोसायटी, बदलापूर पूर्व) असे महिलेचे नाव आहे.

चालकाने रेल्वे थांबवल्याने घटना आली समोर

बदलापूर रेल्वेस्थानकात लोहमार्ग पोलीस कर्मचारी आज (गुरुवारी) दिवसपाळी ड्युटीवर असताना सकाळी 9.25 दरम्यान डाऊन ट्रॅकवर उद्यान एक्सप्रेस अचानक थांबल्याने स्टेशन मास्तरांनी उद्घोषणा केली होती. यावेळी जीआरपी व आरपीएफ कर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता एक महिला डाऊन ट्रॅकवर मिळून आली. धक्कादायक बाब म्हणजे उद्यान एक्स्प्रेस तिच्या अंगावरुन गेल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. मात्र, खडीवर झोपलेल्या अवस्थेत असल्याने, तिच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम किंवा इजा झालेली नाही. त्यांनतर स्टेशन मास्टर, लायसन्स पोर्टर, स्टेचर, हमाल यांच्या मदतीने त्या महिलेला बदलापूर येथे आणून तिची सखोल चौकशी केली असता ती महिला मानसिक तणावात असल्याची माहिती समोर आली.

लोहमार्ग पोलिसांनी तिला केले आईच्या स्वाधीन
चौकशीनंतर या महिलेने तिच्या राहत्या घराचा पत्ता सांगितला. त्यांनतर लोहमार्ग पोलिसांनी तिच्या घरी जाऊन तिची आई प्रमिला अनिल शिंदे (वय 59) यांना बदलापूर लोहमार्ग चौकीत बोलवून त्यांचा जबाब घेऊन त्यांच्या ताब्यात दिले. ती गेल्या आठ वर्षापासून वेडसर असून अधूनमधून घराबाहेर जात असल्याचे तिच्या आईने सांगितले. आजही अशाच प्रकारे घरातून निघून गेल्याचीही माहिती त्यांनी दिली. मात्र मुलीला सुखरूप ताब्यात दिल्याने त्यांनी रेल्वे पोलिसांचे आभार मानले.
हेही वाचा - उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी हिंदू-मुस्लिम दंगे भडकवले जातील - अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.