ठाणे : जमीन वादातून ( Land dispute ) बायकोने नवऱ्याच्या बोटासह गालाला कडाडून चावा घेऊन ( Wife bit her husband ) गंभीर जखमी केल्याची खळबळजनक समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील ( land dispute in bhivandi ) ठाकऱ्याचा पाडा येथे घडली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात बायकोसह बापाला ठार मारण्याची धमकी देणाऱ्या मुलावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सुनंदा प्रकाश ठाकूर (वय ५५) व स्वप्नील प्रकाश ठाकूर ( वय १९ )असे गुन्हा दाखल झालेल्या माय - लेकाची नावे आहेत. तर प्रकाश मारुती ठाकूर (वय ६७) असे गंभीर जखमी झालेल्या नवऱ्याचे नाव आहे,
जमिनीच्या वादातून घडली घटना : तक्रारदार प्रकाश ठाकूर हे भिवंडी तालुक्यातील ठाकऱ्याचा पाडा येथे कुटूंबासह राहतात. त्यांच्या कुटुंबीयांच्या सामायिक जमिनीवर आरोपी पत्नी सुनंदा हिने आपल्या नावावर जमीन करण्याचा तगादा पती प्रकाश यांच्याकडे लावला होता, मात्र सदरची जमीन ही कुटुंबीयांची सामायिक जमीन असल्याने याबाबत घरातील मंडळींना एकत्र करून याबाबतचा निर्णय घेऊ, असे प्रकाश यांनी पत्नी सुनंदा यांना समज दिली होती. मात्र त्यात सुनंदा यांचे समाधान न झाल्याने दोघांमध्ये याच वादातून रविवारी रात्रीच्या सुमारास कडाक्याचे भांडण झाले.
मुलाची बापाला धमकी : या भांडणात बायकोने नवऱ्याच्या डाव्या हाताच्या तर्जनी बोटास व उजव्या गालाला कडाडून चावा घेऊन गंभीर जखमी केले. तर मुलगा स्वप्निल याने जमीन आईच्या नावावर केली नाही तर बघून घेईन अशी धमकी देत शिवीगाळ केली. याप्रकरणी जखमी प्रकाश ठाकूर यांनी सोमवारी बायको व मुला विरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास कोनगाव पोलीस करीत आहेत.