ETV Bharat / state

Widow robbed : इन्शुरन्सचे पैसे मिळवून देतो असे सांगत विधवेला 64 लाखाला लुटले - चौंसष्ट लाखाला लुटले

मराठी भाषेच्या अज्ञानाचा फायदा घेत अमराठी विधवेला पतीचे इन्शुरन्सचे पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने 64 लाखाला ( widow robbed of sixtyfour lakhs ) लुटण्यात आले आहे. वाशी पोलीस ठाण्यात ( Vashi Police Station ) या आरोपींविरोधात भादंवि कलम ४२०, ४६५, ४६७, ४७१ व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता वाशी पोलिसांना या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे.

Three arrested
तिघांना अटक
author img

By

Published : Nov 9, 2022, 11:47 AM IST

नवी मुंबई : मराठी भाषेच्या अज्ञानाचा फायदा घेत अमराठी विधवेला पतीचे इन्शुरन्सचे पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने 64 लाखाला ( widow robbed of sixtyfour lakhs ) लुटण्यात आले आहे. किरण रवी, भास्कर शंकर लांडगे, निखिल संजय थोरवे आणि सॅम्युअल विजय संपत अशी या चार आरोपींची नावे आहेत. 18 ऑगस्ट 2022 रोजी वाशी पोलीस ठाण्यात ( Vashi Police Station ) या आरोपींविरोधात भादंवि कलम ४२०, ४६५, ४६७, ४७१ व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता वाशी पोलिसांना या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे.

तिघांना अटक

बॅंकेत बनावट खाते : यापैकी तिघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. बंदीता पॉल प्रविर असे 50 वर्षीय पीडित महिलेचे नाव आहे. कांदीवलीला राहणाऱ्या बंदीता यांचे पती 13 डिसेंबर 2016 रोजी मयत झाले होते. पतीचा मृत्यूचा दाखला आणि इन्शोरन्सचे पैसे काढून देण्याच्या बहाण्याने पीडीतेकडून आरोपी सॅम्युअलने आधार कार्ड, पॅन कार्ड, तसेच फोटो घेवून आरोपी भास्कर लांडगे याच्यासह जुन्नर येथे जावून पीडीतेच्या नावे रहिवासी दाखला मिळवला. बॅकेत बिझनेस करस्पॉडन्स म्हणून काम करणारा आरोपी निखील थोरवेच्या बॅंकेतील ओळखीचा फायदा घेत, बॅकेत बंदीता पॉल प्रविर यांच्या नावे बनावट खाते उघडले.

पैसे ट्रांसफर करत फसवणूक : आरोपी सॅम्युअल व पीडीत महिला जेव्हा इन्शोरन्सचे पैसे मिळण्यासाठी आयसीआयसीआय प्रुडेंशियलच्या वाशी शाखेत गेले. तेव्हा सॅम्युअलने पीडीत महिलेच्या मूळ बँक खात्याची माहिती न भरता बनावट खात्याची माहिती भरली. आरोपीने याच बनावट खात्यावर पीडीतेच्या पतीचे इन्शोरन्सचे 64 लाख रूपये वळवून घेतले. त्यानंतर सॅम्युअलने या बनावट खात्यातून दुसरा आरोपी किरण रवि औंदच्या खात्यावर पैसे ट्रांसफर करत पीडितेची फसवणूक केली. पीडित महिला बंदीता यांनी या फसवणूक प्रकरणी ग्राहक न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर आयसीआयसीआय पुर्डेन्शियल इन्शोरन्स कंपनीचे मॅनेजर आशिश रमेश चंद्रा यांनी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. 2017 मध्ये घडलेल्या या फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींनी कोणताही पुरावा शिल्लक ठेवलेला नसताना देखील वाशी पोलिसांनी अथक प्रयत्न आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी किरण रवी औद याला नाशिक परिसरातून तसेच भास्कर शंकर लांडगे याला घाटकोपर मुंबईतून तर निखील संजय थोरवेला जुन्नर येथून ताब्यात घेतले.

सॅम्युअल बेंगलोरचा रहिवाशी : तिघांकडे गुन्हयाच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली आहे. मुख्य आरोपी सॅम्यअल याच्यासह संगणमताने सदरचा गुन्हा केल्याचे तिन्ही आरोपींनी कबूल केले आहे. विशेष म्हणजे आरोपी सॅम्युअल हा बेलातूर बेंगलोर कर्नाटकचा रहिवाशी आहे. सध्या तो मकोका कायद्याअंतर्गत पुण्यातील येरवडा तुरुंगात आहे. एका सायबर गुन्ह्या अंतर्गत त्याला पुणे शहरातील सायबर पोलिसांनी अटक केली होती. वाशी पोलीस त्याचा ताबा घेवून सदर प्रकरणाचा पुढील तपास करणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.