ठाणे Whale Vomit Smuggling : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांनी आपसात संगनमत करून कोणत्याही प्रकारची कायदेशीर परवानगी न घेता ८५ लाख ४५ हजार २२० रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी विक्री करण्याच्या हेतूने जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुषंगाने नारपोली पोलिसांनी मुंबई नाशिक महामार्गावरील मानकोली हद्दीतील मिनी पंजाब हॉटेलसमोर सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर भिवंडी वनपरिक्षेत्र अधिकारी पूजा शंतनू रकटाटे यांच्या फिर्यादीवरून तिघांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९,४४,४८,४९(ब),५७,५१ सह भादंविच्या ३४ न्वये नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी या तिघांनाही अटक करण्यात आली आहे.
उलटीचा वापर सुगंधित द्रव्य व औषधांच्या निर्मितीसाठी: मिळालेल्या माहितीनुसार, व्हेल माश्याच्या उलटीचा वापर सुगंधित द्रव्य व औषधांच्या निर्मितीसाठी केला जातो. त्यामुळे या उलटीची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये मिळत असल्याने या उलटीच्या तस्करीला प्रतिबंध आहे. हा दखलपात्र गुन्हा असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बल्लाळ यांनी दिली असून आरोपीला न्यायालयात हजर केले गेले. न्यायालयाने तिघांनाही पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास नारपोली पोलीस पथक करीत आहेत.
ठाण्यात यापूर्वी झाली होती कारवाई: व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्यांवर यापूर्वी ठाण्यात कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती. डोंबिवली खंबाळपाडा भागातील कल्याण रोडला असलेल्या बंदिश पॅलेस हॉटेलसमोर 18 ऑगस्ट, 2022 रोजी बुधवारी दुपारच्या सुमारास दोघे तस्कर येणार असल्याची माहिती पोलीस निरिक्षक सचिन सांडभोर यांना मिळाली होती. त्यानुसार गणेश जाधव, फौजदार केशव हासगुळे त्यांच्या खास पथकाने सकाळपासून हॉटेल परिसरात जाळे पसरले होते. अखेर दुपारी साडेबाराच्या सुमारास दोन जण तेथे पोहोचले. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यातील नंदू राय याच्याकडील पिशवीत आयताकृती आकाराच्या पिवळसर तांबट रंगाच्या 3 दगड सदृश्य वस्तू आढळून आल्या. या वस्तूंचे वजन 725 ग्रॅम भरले. तपासणी केली असता या तिन्ही वस्तू व्हेल माश्याची उल्टी Whale vomit असल्याचे स्पष्ट झाले. व्हेल माश्याची ही उल्टी मध्यस्थीच्या मार्फत 1 कोटी 60 लाख रुपयांना विक्रीसाठी घेऊन आल्याची कबूली नंदू राय याने दिली.
हेही वाचा: