ठाणे - भिवंडी शहरातला पाणीपुरवठा करणाऱ्या पंप स्टेशन व पाइपलाइनच्या दुरुस्तीसाठी येत्या शुक्रवारी २४ तास शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शनिवारी म्हणजे पुढील एक एक दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून प्रसिद्धपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन
भिवंडी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या स्टेम वॉटर डिस्ट्रीब्यूशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत पाणीपुरवठा सुरळीत राहण्याकरिता देखभाल व दुरुस्तीचे काम दोन दिवसांसाठी हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे शुक्रवार दिनांक ६ नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजल्यापासून ते शनिवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे, व त्यानंतर पुढील एक दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण गायकवाड यांनी केले आहे.
भिवंडीत शुक्रवार २४ तास पाणीपुरवठा बंद; तर शनिवारी कमी दाबाने पुरवठा - भिवंडी पाणीपुरवठा
भिवंडी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या स्टेम वॉटर डिस्ट्रीब्यूशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत पाणीपुरवठा सुरळीत राहण्याकरिता देखभाल व दुरुस्तीचे काम दोन दिवसांसाठी हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे शुक्रवार दिनांक ६ नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजल्यापासून ते शनिवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत चोवीस तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.