ETV Bharat / state

Water scarcity in Shahapur Taluka : धरणांच्या तालुक्याला पाण्याच्या टॅंकरचा आधार

मुंबई, ठाणे महानगराची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यात यंदा पाऊस चांगला झाला तरीही पाणीटंचाईने ग्रासले आहे. तालुक्यातील अनेक गावपाड्यांवरील कूपनलिकांनासह विहिरीने तळ गाठला आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटरपर्यंत डोक्यावर हंडा घेऊन पायपीट करावी लागते. यावर उपाय म्हणून पाणी पुरवठा विभागाकडून दरवर्षी लाखो रुपये खर्च करून टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी पुरवठा केले जातो. यंदाही ११ पाण्याच्या टँकरद्वारे ५ गाव आणि २७ आदिवासी पाड्यांना पाणी पुरवठा सुरू आहे. येत्या दिवसात पाणी टंचाईग्रस्त गाव पाड्याची संख्या तिप्पटीने वाढ होणार असून गेल्या वर्षाप्रमाणे १८ टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार असल्याचे संकेत शहापूर पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आले.

author img

By

Published : Apr 7, 2022, 5:41 PM IST

शहापूर
शहापूर

ठाणे - धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूर तालुक्याच्या नशिबी अनेक वर्षापासून उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होऊन महिलांना पाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटरपर्यंत डोक्यावर हंडा घेऊन पायपीट करावी लागते. यावर उपाय म्हणून पाणी पुरवठा विभागाकडून दरवर्षी लाखो रुपये खर्च करून टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी पुरवठा केले जातो. यंदाही ११ पाण्याच्या टँकरद्वारे ५ गाव आणि २७ आदिवासी पाड्यांना पाणी पुरवठा सुरू आहे. येत्या दिवसात पाणी टंचाईग्रस्त गाव पाड्याची संख्या तिप्पटीने वाढ होणार असून गेल्या वर्षाप्रमाणे १८ टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार असल्याचे संकेत शहापूर पाणी पुरवठा विभागाकडून ( Shahapur Water Supply Department ) देण्यात आले. मात्र, पाणीटंचाईने ग्रासलेल्या शहापूर तालुक्यासाठी प्रस्तावित असलेली भावली पाणी योजना होईपर्यंत नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार आहे.

धरणांच्या तालुक्याला पाण्याच्या टॅंकरचा आधार

महानगरासाठी प्रतिदिनी साडेचार हजार दशलक्ष लिटर पाणी पुरवठा - मुंबई, ठाणे महानगराची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यात यंदा पाऊस चांगला झाला तरीही पाणीटंचाईने ग्रासले आहे. तालुक्यातील अनेक गावपाड्यांवरील कूपनलिकांनासह विहिरीने तळ गाठला आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले असून या गावपाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून काही गावपाडे वगळता बहुतांशी गावपाड्यांवर दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. यामुळे महिला भगिनींना पाण्याच्या टँकरची चातकासारखी वाट बघावी लागत आहे. भातसा, तानसा व वैतरणा या शहापूर तालुक्यातील मोठ्या जलाशयातून मुंबई, ठाणे या दोन महानगरासाठी प्रतिताशी व प्रतिदिनी साडे चार हजार दशलक्ष लिटर प्रमाणे पाणी पुरवठा पोहचते.

सध्याच्या घडीला ११ टँकरद्वारे पाणी पुरवठा - शहापूर तालुक्यातून महानगरासाठी पाणी पुरवठा केला जातो. मात्र तो तालुका सध्या तहानलेला आहे. शहापूर तालुक्यात सन २०११ च्या जनगणनेनुसार ३ लाख १४ हजार १०३ एवढी लोकसंख्या आहे . तर २२८ महसूल गावांचा समावेश असून ११० एवढ्या ग्रामपंचायती आहेत. पाणी टंचाई कृती आराखड्यात दरवर्षी गाव पाड्यासह टँकरची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. यंदा मार्च महिन्यात पाणी टंचाई सुरू झाली असून कसारा दुर्गम भागातील कोठारे - थ्याचा पाड्यासह ५ गाव १३ पाड्यांना सध्याच्या घडीला ११ टँकर मंजूर करून त्याद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. मे अखेर टँकरचा आकडा दुप्पटीवर जाणार आहे. तालुक्यातील कसारा, वाशाळा, दांड, शिरोळ, अजनुप, खर्डी आदी परिसरातील अनेक गावपाड्यांवर टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्याची तयारी पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

१८ वर्षांपासून कोट्यवधी रूपये खर्च - यंदाच्या संभाव्य पाणी टंचाई कृती आराखड्यानुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे तसेच बुडक्या विहिरी घेणे, विहिरीची खोली करणे व गाळ काढणे, विहिर अधिग्रहण करणे, नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, पूरक नळ पाणी पुरवठा योजना करणे, विंधन विहीरी घेणे व दुरुस्ती करणे या कामांचा समावेश असल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. दरवर्षी पाणीटंचाई उपाययोजना करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चाचा आराखडा प्रस्तावित करण्यात येत असला तरी पाणी योजनांबाबतीत ठोस नियोजनाचा अभाव असल्याने पाणी टंचाई कृती आराखड्यात दिवसेंदिवस गाव पाड्यासह टँकरची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. ११० ग्रामपंचायतीमध्ये जल स्वराज्य, भारत निर्माण, राष्ट्रीय पेयजल यांसारख्या लोकवर्गणीतून करण्यात येणाऱ्या दोनशेहून अधिक योजना केवळ कागदावरच पूर्ण झाल्याचे दिसून आले. या योजनांवर गेली १८ वर्षांपासून कोट्यवधी रूपये खर्च झाले.

२७६ कोटींच्या भावली पाणीपुरवठा योजना मंजूर - गेल्या वर्षी ठाकरे सरकारने २७६ कोटींच्या भावली पाणीपुरवठा योजनेची निविदा काढल्याने शहापूर तालुक्यातील पाणी टंचाईचा प्रश्न निकाली लागेल. मात्र, मार्च २०२४ पर्यंत ही योजना पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले. या योजनेमुळे कसारा व खर्डी जवळील दुर्गम डोंगर व पठार भागातील गावकऱ्यांना या योजनेचा विशेष फायदा होताना दिसतो. मात्र, तोपर्यंत तालुक्यातील आदिवासी बांधव टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागणार आहे.

बहुतांश योजनामध्ये भ्रष्टाचार - विशेष म्हणजे २००८ पासून आतापर्यंत १९३ नळपाणी पुरवठा योजनापैकी बहुतांश योजनामध्ये भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकून पडल्या आहेत. त्यामुळे २०२४ पर्यंत तरी भावली योजना पूर्ण होऊन तालुका टँकरमुक्त होणार का ?, असा सवाल पाणी टंचाईने ग्रासलेल्या गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा - Shivsena Vs Somaiya : 'गली गली शोर है किरीट सोमैया...'; ठाण्यात शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.