ETV Bharat / state

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी केडीएमसीचे जनजागृती अभियान - मतदान

महापालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेर 'होय, मी मतदान करणार' अशा आशयाचा फलक लावण्यात आला असून त्या फलकावर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात येत आहेत.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती अभियान
author img

By

Published : Apr 1, 2019, 11:33 AM IST

ठाणे - लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी कल्याण रेल्वे महानगरपालिकेमार्फत मतदान जागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाची सुरुवात शुक्रवारी डोंबिवली विभाग कार्यालय आणि महापालिका मुख्यालयापासून करण्यात आली. महापालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेर 'होय, मी मतदान करणार' अशा आशयाचा फलक लावण्यात आला असून त्या फलकावर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात येत आहेत.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती अभियान

महापालिकेचे उपायुक्त तथा नोडल अधिकारी विजय पगारे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी 'त्या' फलकावर स्वाक्षरी करून आरंभ केला. अशाच प्रकारची स्वाक्षरी मोहीम महापालिकेचे डोंबिवली कार्यालयात देखील प्रभाग क्षेत्र अधिकारी परशूराम कुमावत आणि अरुण वानखडे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आली. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाची टक्केवारी वाढवण्याकरिता महापालिका क्षेत्रात विविध उपक्रम राबवण्यात सुरुवात केली आहे.

या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांनी नावे मतदार म्हणून नोंद केली किंवा नाही हे पाहणे. तसेच त्यांना मतदान प्रक्रियेत भाग घेण्याकरिता प्रवृत्त करणे यासाठी शाळांमध्ये जाऊन 'चुनावी पाठशाला' उपक्रम राबविण्यात येत आहे. या शिवाय महापालिकेच्या परिवहन सेवेतील बसेसवर 'मतदान करा' अशा प्रकारचे स्टिकर लावण्यात आली असून पथनाट्य देखील करण्यात येत आहे. प्रामुख्याने मुख्य चौकात तसेच अधिकृत ठिकाणी बॅनर बॅनर होर्डिंग लावून मतदार जनजागृती करण्यात येत आहे.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी केडीएमसीचे जनजागृती अभियान

ठाणे : लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी कल्याण रेल्वे महानगरपालिकेमार्फत मतदान जागृती अभियान सुरू करण्यात आला आहे या अभियानाची सुरुवात शुक्रवारी डोंबिवली विभाग कार्यालय आणि महापालिका मुख्यालय पासून करण्यात आली महापालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेर होय मी मतदान करणार अशा आशयाचा फलक लावण्यात आला असून त्या फलकावर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात येत आहे

महापालिकेचे उपायुक्त तथा नोडल अधिकारी विजय पगारे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी त्या फलकावर स्वाक्षरी करून आरंभ केला अशाच प्रकारची स्वाक्षरी मोहीम महापालिकेचे डोंबिवली कार्यालयात देखील प्रभाग क्षेत्र अधिकारी परशूराम कुमावत आणि अरुण वानखडे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आली
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाची टक्केवारी वाढवण्याकरिता महापालिका क्षेत्रात विविध उपक्रम राबवण्यात सुरुवात केली आहे या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयात जाऊन प्राचार्यांच्या व विद्यार्थ्यांची नावे मतदार म्हणून नोंद केली किंवा नाही व कसे त्यांना मतदान प्रक्रियेत भाग घेण्याकरिता प्रवृत्त करणे शाळांमध्ये जाऊन चुनावी पाठशाला उपक्रम राबविण्यात येत आहे याशिवाय महापालिकेच्या परिवहन सेवेतील बसेस वर मतदान करा अशा प्रकारचे स्टिकर लावण्यात आली असून पथनाट्य देखील करण्यात येत आहे प्रामुख्याने मुख्य चौकात तसेच अधिकृत ठिकाणी बॅनर बॅनर होर्डिंग लावून मतदार जनजागृती करण्यात येत आहे

Conclusion:मतदान जनजागृती अभियान
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.