ETV Bharat / state

अंबरनाथमध्ये लग्नमंडपात नवरीच्या हटके एन्ट्री; वऱ्हाडी मंडळींना बसला आश्चर्याचा धक्का, व्हिडिओ व्हायरल

लग्नासाठी पाहुणे, नातेवाईक आणि मित्रपरिवार जमलेलेच होते. त्यातच नवरदेवही नवरीची वाट पाहत होता. नववधू हर्षदा ही स्वतः जीप चालवत आलेली पाहून नवरदेवाकडील वऱ्हाडी मंडळींसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला

नववधूने जीपमधून केलेली एन्ट्री
author img

By

Published : May 18, 2019, 2:30 PM IST

ठाणे - लग्न म्हटले की थाट माट पाहायला मिळतो. अनेकजण यामध्ये काहीतरी वेगळेपण आण्याचा प्रयत्न करत असतात. असाच आगळावेगळा थाट अंबरनाथ पश्चिमेतील कानसई गावात पाहायला मिळाला. या लग्नातील नववधू चक्क विवाहस्थळापर्यंत स्वतः जीप चालवत आली होती. या नवरीची डॅशिंग एन्ट्री पाहून वऱ्हाडी मंडळींना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यानंतर या नवरीच्या एन्ट्रीचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही घटना समोर आली आहे.

नववधूच्या एन्ट्रीचा व्हायरल झालेला व्हिडीओ

लग्नसोहळ्यात प्रत्येकाला काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असते. मात्र, नववधू हर्षदा हिची आणि तिच्या भावाची इच्छा लग्नमंडपात जीपमधून येऊन पूर्ण झाली आहे. अंबरनाथमधील कानसई गावातील आगरी समाजाच्या असणाऱ्या रमेश भोईर यांनी आपल्या मुलीची ही इच्छा पूर्ण केली. डॅशिंग राहण्याची आवड असलेल्या हर्षदाचे लग्न नवीमुंबईतील क्रिकेटर असणाऱ्या अनुप पाटील सोबत आनंद सागर येथे झाले. या लग्नसोहळ्यात हर्षदा स्वतः जीप चालवत आली. लग्नासाठी पाहुणे, नातेवाईक आणि मित्रपरिवार जमलेलेच होते. त्यातच नवरदेवही नवरीची वाट पाहत होता. नववधू हर्षदा ही स्वतः जीप चालवत आलेली पाहून नवरदेवाकडील वऱ्हाडी मंडळींसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, यामधून हर्षदाची आणि तिच्या भावाची दिमाखदार एंट्रीबाबतची असलेली इच्छा पूर्ण झाल्याचे पाहायला मिळाले.

आगरी समाज एक पाऊल पुढे आहे, अशी चर्चा लग्नमंडपात रंगली होती. दरम्यान यापूर्वीही एका नवरीची बुलेट चालवत लग्नमंडपातील एन्ट्री सोशल मीडियावर भलतीच गाजली होती.

अंबरनाथमध्ये लग्नमंडपात नवरीच्या हटके एन्ट्रीने  वऱ्हाडी मंडळींना बसला आश्चर्याचा धक्का !

ठाणे :- लग्न म्हंटल कि थाट माट पाहायला मिळतो. अनेकदा यात काहीतरी वेगळेपण आण्याचा प्रयत्न करत असतात, असाच आगळावेगळा थाट अंबरनाथ पश्चिमेतील  कानसई गावातील राहणाऱ्या नववधूने चक्क विवाहस्थळापर्यंत स्वतः जीप चालवत आली होती. या नवरीची डॅशिंग एन्ट्री पाहून वऱ्हाडी मंडळींना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यानंतर या नवरीच्या एन्ट्रीचे व्हिडीओ, फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने हि घटना समोर आली आहे.

लग्नसोहळ्यात प्रत्येकाला काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असते. मात्र नववधू हर्षदा हिची आणि इच्छा तिच्या भावाची इच्छा लग्नमंडपात जीपमधून येऊन पूर्ण झाली आहे. अंबरनाथ मधील कानसई गावातील आगरी समाजाच्या असणाऱ्या रमेश भोईर यांनी आपल्या मुलीची इच्छा पूर्ण केलीये. डॅशिंग राहण्याची आवड असलेल्या हर्षदाचं लग्न नवीमुंबईतील क्रिकेटर असणाऱ्या अनुप पाटील सोबत आनंद सागर येथे झालं. मात्र कोणाची झाली नाही अशी दिमाखदार एंट्री आपल्या बहिणीचं व्हावी म्हणून या लग्नसोहळ्यात हर्षदा स्वतः जीप चालवत आली. आणि डिझायनर असलेल्या  हर्षदाचा रॉयल मेकअप sanas प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टने केला होता. तर लग्नासाठी पाहुणे, नातेवाईक आणि मित्रपरिवार जमलाच होता. त्यातच नवरदेव हि नवरीची वाट पाहत होता. नववधू हर्षदा हि स्वतः जीप चालवत आली पाहून नवरदेवाकडील वर्हाडी मंडळींसह सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र यातून हर्षदची आणि तिच्या भावाची दिमाखदार एंट्रीबाबतची असलेली इच्छा पूर्ण झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि आगरी समाज एक पाऊल पुढे आहे अशी चर्चा लग्नमंडपात रंगली होती. दरम्यान यापूर्वीही एका नवरीची बुलेट चालवत लग्नमंडपातील एन्ट्री सोशल मिडीयावर भलतीच गाजली होती.  

I’m protected online with Avast Free Antivirus. Get it here — it’s free forever.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.