ETV Bharat / state

दिव्यातील 'दबंग' पालिका अधिकाऱ्याची धमकीची क्लिप व्हायरल, पाठीशी कोण?

दोनच दिवसांपूर्वी दिवा येथील भाजपचे निलेश पाटील यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यांना व्हॉटसअ‌ॅप कॉल करून खोटे गुन्हे दाखल करण्याची व राहती घरे तोडण्याची धमकी दिली, असे पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. आता या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चक्क व्हिडीओ क्लिप व्हायरल होत असून एकप्रकारे अधिकाऱ्याने अशा प्रकारचे कृत्य केल्याने दिव्यात आणि पालिका मुख्यालयात आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच, पालिका आयुक्तांनी यात लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

दिव्यातील 'दबंग' पालिका अधिकाऱ्याची धमकीची क्लिप व्हायरल

author img

By

Published : Feb 14, 2021, 8:01 PM IST

ठाणे - दिवा येथील अनधिकृत बांधकाम जसेजसे वाढत आहे, तसतसे दिवा प्रभाग समितीमधील खळबळ माजवणारे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ समोर येऊ लागले आहे. दिवा प्रभाग समितीत कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून हा अधिकारी एका कर्मचाऱ्याला धमकावत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दिव्यातील 'दबंग' पालिका अधिकाऱ्याची धमकीची क्लिप व्हायरल

मोठमोठ्या ओळखी सांगून कर्मचाऱ्यांना धमकी

या व्हिडिओमध्ये अधिकारी चक्क धमकी देत आहे. तो मोठमोठ्या ओळखी सांगून येथील कर्मचाऱ्यांना धमकावत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकप्रकारे अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करत असल्याचे या निमित्ताने निदर्शनास आले आहे. दरम्यान, या अधिकाऱ्यांच्या विरोधात स्थानिक भाजप नेत्याने पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली असून या अधिकाऱ्याने ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे या दबंग अधिकाऱ्यावर नेमका कोणाचा वरदहस्त आहे? पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा या दबंग अधिकाऱ्याकडे लक्ष देणार का, असा प्रश्न समोर आहे.

व्हिडिओ क्लिपच व्हायरल

दिवा विभागात मागील काही वर्षांत अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. राजरोसपणे सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांच्या विरोधात आता आवाज उठू लागला असून तक्रार करणाऱ्याला काही वेळा धमकावले जात असल्याचा आरोप भाजपचे ठाणे अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केला होता. आता तर चक्क दिवा प्रभाग समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची व्हिडिओ क्लिपच व्हायरल झाली असल्याने अनधिकृत बांधकामाला पालिकेचे अधिकारी तर जबाबदार नाहीत ना, असा सवाल उपस्थित झाला आहे.

दोनच दिवसांपूर्वी दिवा येथील भाजपचे निलेश पाटील यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. संबंधित ठिकाणी कारवाई करण्याऐवजी निलेश पाटील यांना व्हॉटसअ‌ॅप कॉल करून खोटे गुन्हे दाखल करण्याची व राहती घरे तोडण्याची धमकी दिली, असे पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. आता या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चक्क व्हिडीओ क्लिप व्हायरल होत असून एकप्रकारे अधिकाऱ्याने अशा प्रकारचे कृत्य केल्याने दिव्यात आणि पालिका मुख्यालयात आश्चर्य व्यक्त होत आहे.

अनधिकृत बांधकामाला जबाबदार कोण?

कोरोनाकाळापासून अनधिकृत बांधकामे होत असताना जे वरिष्ठ अधिकारी आपले कर्तव्य पार पाडत होते, ते अधिकारी फक्त जानेवारी महिन्यात रजेवर असताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच ते सुट्टीवर असताना एवढ्या महत्वाच्या पदाचा कार्यभार कुणाकडे सोपवण्यात आला नव्हता का ? याच दरम्यान अनधिकृत बांधकामांना संदर्भात लिपिक असलेल्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले होते. मग या महाशय अधिकाऱ्यांना कोण पाठीशी घालत आहे ? असा सवाल उपस्थित झाला आहे.

या क्लिपशी झालीय छेडछाड

ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या संदर्भामध्ये महापालिकेचे अधिकारी महेश आहेर यांनी या क्लिपमध्ये काही छेडछाड करून ती व्हायरल करण्यात आली असल्याचा आरोप केला आहे. या संदर्भामध्ये पोलिसांकडे तक्रार देणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.