ETV Bharat / state

व्हॉट्सअॅप वरून पत्नीला दिला 'ट्रिपल तलाक' - triple talaq

एकीकडे मुस्लिम भगिनींच्या न्याय्य हक्कांसाठी तिहेरी तलाकबंदी विधेयकाच्या संमतीसाठी संसदेत प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे भिवंडीत एका महिलेला हुंड्यासाठी चक्क व्हॉट्सअॅपवरुन तीन तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने पोलीस स्थानकात तसेच महिला मंडळात धाव घेतली आहे.

victim
author img

By

Published : May 8, 2019, 2:05 AM IST

ठाणे - एकीकडे मुस्लिम भगिनींच्या न्याय्य हक्कांसाठी तिहेरी तलाकबंदी विधेयकाच्या संमतीसाठी संसदेत प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे भिवंडीत एका महिलेला हुंड्यासाठी चक्क व्हॉट्सअॅपवरुन तीन तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने पोलीस स्थानकात तसेच महिला मंडळात धाव घेतली आहे.

पीडित महिलेने पतीसह सासरच्या तीन जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे .नदीम शेख असे व्हॉट्सअॅपवरून तलाक देणाऱ्या पतीचे नाव असून पाच वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. त्यांना एक मुलगादेखील आहे. पती नदीम शेख टेक्निकल इंजिनीअर म्हणून कल्याणमध्ये काम करतो, तर पीडित महिला ही पायाने अपंग असून घरकाम करते. अशा परिस्थितीत व्हॉट्सअॅप माध्यमातून ट्रिपल तलाक देण्यात आल्याने महिलेला धक्का बसला असून तिने पोलिस ठाण्यासह महिला मंडळात धाव घेतली आहे.

पीडित महिला आरजू शेख हिचा 18 मे 2014 रोजी नदीम याच्यासोबत मुस्लिम धार्मिक रितीप्रमाणे निकाह झाला होता. त्यावेळी हुंडा म्हणून आरजूच्या आई-वडिलांनी जावई नदीमला 10,051रु व संसारोपयोगी वस्तू भेट दिल्या. मात्र लग्नाच्या काही दिवसानंतर लगेचच नदीमने पीडित महिलेचा छळ करायला सुरुवात केली. तिला मारझोड करणे, शिवीगाळ करणे, चारित्र्यावर संशय घेणे असे प्रकार सुरू केले. सर्व त्रास सहन करुनही पीडितेने पाच वर्ष संसार टिकवून ठेवला. नदीम व आरजू यांना एक चार वर्षाचा गोंडस मुलगा आहे.

मागील काही महिन्यांपासून नदीमने फ्लॅट घेण्यासाठी 10 लाखांच्या हुंड्याची मागणी केली. मागणी पूर्ण न केल्याने पीडितेला बेदम मारहाण करून तिला घरातून बाहेर काढून देण्यात आलं. तसेच महिलेला व्हॉट्सअॅपवर ट्रिपल तलाक दिल्याचं सांगितलं गेलं. यानंतरही महिलेने पती नदीमला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा प्रतिसाद मिळाला नाही. अनेक दिवसांपासून पीडिता न्यायाची अपेक्षा करत पोलीस स्टेशन व महिला मंडळात धाव घेत आहे, मात्र अजूनही तिच्या तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही.

व्हाट्सएपवरून पतीने पत्नीला दिला 'ट्रीपल तलाक' ; पीडितेची न्यायासाठी याचना 

ठाणे :-  मुस्लिम भगिनींच्या न्याय हक्कासाठी तिहेरी तलाकबंदी विधेयक संमत व्हावे यासाठी संसदेत प्रयत्न सुरू असतानाच भिवंडीत एका महिलेला हुंड्यासाठी चक्क व्हाट्सएपवरन तीन तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिस स्थानकात तसेच महिला मंडळात धाव घेतली आहे.पीडित महिलेने पतीसह सासरच्या तीन जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे .नदीम शेख असे व्हॉट्सऍपवरून तलाक क देणाऱ्या पतीचे नाव असून पाच वर्षांपूर्वी 2014 साली त्यांचे लग्न झाले होते व त्यांना एक मुलगा देखील आहे.पती नदीम शेख टेक्निकल इंजिनीअर म्हणून कल्याणमध्ये काम पाहतो तर पीडित महिला ही पायाने अपंग असून घरकाम करते मात्र अशा परिस्थितीत या महिलेला ट्रिपल तलाक व्हाट्सअपच्या माध्यमातून देण्यात आल्याने महिलेला धक्काच बसला असून पोलिस ठाण्यासह तिने महिला मंडळात धाव घेतली आहे 
पीडित महिला आरजू शेख  (23 रा. दिवनशाहा दर्गा ) हिचा 18 मे 2014 रोजी नदीम याच्यासोबत मुस्लिम धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे निकाह झाला होता. त्यावेळी हुंडा म्हणून आरजूच्या आई-वडिलांनी जावई नदीम यास 10,051रु व संसारोपयोगी वस्तू भेट दिली होती. मात्र लग्नाच्या काही दिवसानंतर लगेचच  पीडित महिलेचा छळ करायला सुरुवात केली तिला मारझोड करणे शिवीगाळ करणे तू पसंत नाही असे  कारण देत नेहमी मारझोड करणारा तसेच नदीम हा तिच्या चारित्र्यावर संशय ही घेत असे मात्र एवढा त्रास सहन केल्यानंतर या पीडित महिलेने पाच वर्ष आपला संसार टिकवून ठेवला होता नदीम व आरजू यांच्यापासून एक चार वर्षाचा गोंडस बाळ ही आहे  परंतु मागील काही महिन्यांपासून नदीमने फ्लॅट घेण्यासाठी 10 लाखांच्या हुंड्याची मागणी केली  व ती  पूर्ण न केल्याने पीडित महिलेला बेदम मारहाण करून तिला घरातून बाहेर काढून देण्यात आलं तसेच महिलेला व्हाट्सअपवर ट्रिपल तलाक  दिल्याचं सांगितलं गेलं हा शब्द ऐकल्यानंतर तिच्या पायाखालची वाळू सरकली यानंतरही महिलेने पती नदीम यास संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे  तिच्याशी तलाक  झाल्याचं सांगितलं तेव्हापासून ही पीडित महिला न्यायाची अपेक्षा करत पोलीस स्टेशन व महिला मंडळात धाव घेत आहे मात्र अजूनही या महिलेची दखल घेण्यात आलेली नाही
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.