नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० जुड्यांप्रमाणे शेपूच्या दरात पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे. १०० किलोप्रमाणे दोडक्याच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे.कारलीच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहेआहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. कोणत्या भाजीचे दर कितीने वाढले जाणून घेऊयात.
vegetables-rates-today-in-apmc-market-navi-mumbai
फळभाज्यांचे दर : काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते २००० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३५०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २९०० रुपये ते ३४०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३५००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३८००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ७५०० रुपये ते ९००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे
१५०० रुपये ते १६०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १२०० रुपये ते १४०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते १४०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ५००० रुपये ते ६००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३०००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५०००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३९०० रुपये ते ४४०० रुपये आहे.
पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १४०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १५०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया २००० रुपये ते २५०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १६०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३००० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ८०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३००रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये २५०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १५०० रुपये आहे.