ठाणे - फ्रंट लाईन वर्कर्स पाठोपाठ ४५ वर्षावरील ठाणेकरांना लसीकरण करण्याची मोहीम सुरु आहे. यात ठाणे कारागृहातील ३ हजार ८०० कैद्यांपैकी ८० कैद्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. अत्यंत चोख पोलीस बंदोबस्तात या कैद्यांचे लसीकरण सिव्हिल रुग्णालयात करण्यात येत आहे. तर संपूर्ण कैद्यांचे लसीकरण करण्याचा मानसही प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
तर हे काम जोखमीचे
लसीकरणासाठी कैद्यांना बाहेर काढत कैद्यांचे लसीकरण करण्यासाठी ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात आणले जात आहे. कारागृहातून कैद्यांना आणण्यासाठी जेल प्रशासनाला मोठा बंदोबस्त तैनात करावा लागत आहे. एका वेळेस २० कैद्यांना लसीकरणासाठी बाहेर आणले जात आहे. त्यात सिव्हिल रुग्णालयातही कर्मचारी तैनात करावा लागत आहे. त्यामुळे ही बाब मोठ्या जोखमेची मानली जात आहे.
३ हजार ७२० कैदी लसीकरणाच्या प्रतिक्षेत
ठाणे कारागृहात बंदिस्त असलेले ३ हजार ८०० कैदी हे विविध गुन्ह्यातील कैदी आहेत. यात काही कैदी हे अंडरटेन कपात आहेत. त्यांना वेळोवेळी न्यायालयीन सुनावणीसाठी हजर करावे लागतात. तर काही कैदी हे न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा भोगत आहेत. न्यायालयीन सुट्टीत मोठ्या बंदोबस्तात २० कैद्यांचे लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती आहे. ठाणे कारागृहातील तब्बल ३ हजार ७२० कैदी अजूनही लसीकरणाच्या प्रतिक्षेत आहेत.
हेही वाचा-आरोग्यमंत्र्यांची अचानक मालेगावला भेट; सामान्य रुग्णालयासह महापालिकेच्या रुग्णालयांची केली पाहणी