ETV Bharat / state

पाम बीच हत्या प्रकरणाचा पोलिसांकडून 24 तासात छडा, आरोपी गजाआड

author img

By

Published : Nov 24, 2020, 10:25 PM IST

Updated : Nov 24, 2020, 10:31 PM IST

वाशी पाम बीच रोड येथील अज्ञात व्यक्तीच्या खुनाचा सानपाडा पोलिसांनी 24 तासात छडा लावला आहे. याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

vaasi Palm Beach murder
पाम बीच हत्या प्रकरणाचा 24 तासात छडा

नवी मुंबई - वाशी पाम बीच रोड येथील अज्ञात व्यक्तीच्या खुनाचा सानपाडा पोलिसांनी 24 तासात छडा लावला आहे. याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तंबाखुच्या वादातून हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पाम बीच रोडवर आढळून आली होती अज्ञात जखमी व्यक्ती -

पाम बीच रोड येथे 19 नोव्हेंबरला एका अज्ञात व्यक्तीचा जखमी होऊन पडला होता. त्याच्या डोक्याला पाठीमागे खोलवर जखम झाली होती. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यानंतर जखमींचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास केला असता संबधित व्यक्तीचा खून झाल्याचे लक्षात आले.

पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस अधिकारी
सानपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता गुन्हा -

याप्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला पोलिसांनी 24 तासात खुनाचा छडा लावत कोणताही पुरावा नसतानाही नेरुळ येथील ओमप्रकाश शर्मा याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.

तंबाखूच्या वादातून झाला होता खून -

आरोपीकडे मृत व्यक्तीने तंबाखुची मागणी केली मात्र आरोपीने मी काय दुकानदार आहे का असे म्हटले, याचा राग मनात धरून, मृत व्यक्तीने आरोपीला थप्पड मारून लाथ मारली. याचा राग मनात धरून आरोपीने मागून मृताच्या डोक्यात लोखंडी पाईपने वार करून खून केल्याची कबुली दिली.

Last Updated : Nov 24, 2020, 10:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.