ETV Bharat / state

Shambhuraj Desai : डोंगर भागातील नागरिकांना तात्काळ स्थलांतरित करा; पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आदेश - Urgently evacuate residents of hilly areas

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ठाणे जिल्ह्यातील डोंगरी भागातील रहिवाशांना तातडीने स्थलांतरित करण्याचे आदेश दिले. त्यांनी आज ठाणे जिल्ह्यातील उपाययोजनांचा आढावा घेतला. इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर शंभूराज देसाई यांनी तातडीची बैठक घेऊन डोंगराळ भागातील वस्त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Shambhuraj Desai
Shambhuraj Desai
author img

By

Published : Jul 22, 2023, 10:38 PM IST

Updated : Jul 23, 2023, 5:34 PM IST

शंभूराज देसाई यांची पत्रकार परिषद

ठाणे : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी तातडीची बैठक घेऊन ठाणे जिल्ह्यात असलेल्या डोंगर भागातील वसाहतीचा आढावा घेतला. बऱ्याच ठिकाणी डोंगराळ भागात नागरिक वस्ती करून राहतात. ज्या वस्त्यांना धोका आहे, तिथल्या सर्व वसाहती तातडीने स्थलांतरित करण्याचे आदेश शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. ठाणे जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरस्थितीबाबत करण्यात आलेल्या उपाययोजना आढावा पालकमंत्री देसाई यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर ठाण्यातील झोपडपट्यांचा

जलद गतीने उपाययोजना करा : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांनी पूर्णतः सजग राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्तीच्यावेळी कमीत कमी वेळेत प्रतिसाद देऊन जलद गतीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत.

पोलीस विभागाने जास्तीत जास्त पेट्रोलिंग करावे. रात्रीची गस्त वाढवावी, त्याचबरोबर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीजसंबंधी उद्भवणाऱ्या अडचणींना तात्काळ प्रतिसाद द्यावा. आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता कायम सज्ज ठेवावी - मंत्री, शंभूराज देसाई

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करताना देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदनशीलता, कर्तव्यभावना अधोरेखित केली. राज्याचा प्रमुख एखाद्या दुर्घटनेबाबत इतके संवेदनशील असू शकतात, तर आपण त्याचे नक्की अनुकरण करावे, असे आवाहन देसाई यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केले. आपल्या कामाबाबत आपणही तितकेच संवेदनशील असले पाहिजे, असेही पालकमंत्री देसाई म्हणाले.

प्रशासनाचा हलगर्जीपणा : ठाणे महानगरपालिकेचे प्रशासन, वनविभाग हे या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप समजिक कार्यकर्ते करत आहेत. मतांसाठी राजकीय पक्ष देखील या झोपडपट्ट्यांना अभय देत आहे. दरवर्षी या झोपड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत, असल्याचे ठाकरे गटाचे नेते संजय घाडीगावकर यांनी सांगितले. राजकीय फायदा घेण्याचा असे प्रकार सुरू असल्याचा आरोप देखील घाडीगावकर यांनी केला.

आमदारांचे झोपडपट्ट्यांना अभय : यासंदर्भामध्ये कितीही तक्रारी केल्या तरी, पालिका प्रशासन, वनविभाग कारवाई करत नसल्याचे सामाजिक कार्येकर्ते तुषार रसाळ यांनी सांगितले आहे. राजकीय फायद्यासाठी स्थानिक नगरसेवक आमदारांचे झोपडपट्ट्यांना अभय मिळते. त्यामुळे असा घटना घडतात, असे रसाळ यांनी म्हटले आहे.

पालिका अधिकारी बैठकीत व्यस्त : या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या प्रशासनाची बाजू समजून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता, आम्ही बैठकीत असून यावर लवकरच तोडगा काढला जाईल असे उपायुक्त गोदापुरे यांनी सांगितले.

बैठकीला विविध विभाचे अधिकरी उपस्थित : या बैठकीस आमदार किसन कथोरे, गीता जैन, मंदा म्हात्रे, निरंजन डावखरे, प्रमोद (राजू) पाटील, संजय केळकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे शहर पोलीस आयुक्त जय जित सिंह, ठाणे महापलिका आयुक्त अभिजित बांगर, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, पोलीस सह आयुक्त दत्तात्रय कराळे, उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख व मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले, अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अनिता जवंजाळ, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल(एन डीआरएफ)चे अधिकारी तसेच महसूल,पोलीस, महावितरण, नागरी संरक्षण दल यासह विविध शासकीय विभागांचे विभाग/कार्यालयप्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा - Sambhuraj Desai On Eknath Shinde : पंतप्रधान-मुख्यमंत्री शिंदे भेटीचे राजकारण करू नये - शंभूराज देसाई

Last Updated : Jul 23, 2023, 5:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.