ठाणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत नोयडाच्या इशिता किशोर हिने देशात प्रथम क्रमांक मिळवला तर ठाण्याची डॉ. कश्मिरा संखे राज्यात पहिली आली आहे. पुण्याच्या चाणक्य मंडळाची विद्यार्थीनी असलेल्या कश्मिराने देशात २५ वा क्रमांक पटकावला आहे.
अधिकारी बनून देशाची सेवा करण्याची इच्छा : कश्मिराने आपल्या या यशाचे श्रेय आई-वडिलांना दिले आहे. माझे कुटुंब आणि मित्रपरिवाराचे मला सहकार्य लाभल्याने हे शक्य झाल्याचे तिने सांगितले. सरकारी अधिकारी बनून देशाची सेवा करण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे. कश्मिराची मोठी बहिण डेंटिस्ट आहे. यूपीएससी परीक्षा देण्याआधी कश्मिरा तिच्या ताईच्या क्लिनिकमध्ये सहायक डेंटिस्ट म्हणून काम करीत होती.
अव्वल ३ क्रमांक महिलांनीच पटकावले : केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर अंतिम निकाल जाहीर केले आहेत. यंदाही या परीक्षेत अव्वल ३ क्रमांक महिलांनीच पटकावले आहेत. इशिता किशोरने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्यानंतर गरिमा लोहिया दुसऱ्या तर उमा हरीथी एन. तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्मृती मिश्रा चौथ्या क्रमांकावर आहे.
933 उमेदवारांना यश : नागरी सेवा परीक्षा 2022 मध्ये 933 उमेदवारांना यश मिळाले. त्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गाचे ३४५ उमेदवार, ईडब्ल्यूएस प्रवर्गाचे ९९ उमेदवार, ओबीसी प्रवर्गाचे २६३ उमेदवार, एससी प्रवर्गाचे १५४ आणि एसटी प्रवर्गाचे ७२ उमेदवार आहेत. शिफारस केलेल्या उमेदवारांव्यतिरिक्त, UPSC अंतिम निकाल 2022 मध्ये उमेदवारांची राखीव यादी देखील समाविष्ट केली आहे. या राखीव यादीत 178 उमेदवार आहेत, ज्यात सर्वसाधारण प्रवर्गातील 89 उमेदवार, EWS श्रेणीतील 28 उमेदवार, OBC प्रवर्गातील 52 उमेदवार, SC प्रवर्गातील 5 उमेदवार आणि ST प्रवर्गातील 4 उमेदवारांचा समावेश आहे.
1022 पदे भरली जाणार आहेत : विशेष म्हणजे, UPSC अंतिम निकाल 2022 पासून विविध सेवांमध्ये एकूण 1022 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या रिक्त पदांची विविध श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे: सर्वसाधारणसाठी 434, EWS साठी 99, OBC साठी 263, SC साठी 154 आणि ST उमेदवारांसाठी 72. सेवांमध्ये IAS, IFS, IPS, केंद्रीय सेवा गट 'A' आणि गट 'B' सेवांचा समावेश आहे.
परीक्षेचे तीन टप्पे : UPSC नागरी सेवा परीक्षा तीन टप्प्यात विभागली जाते. प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्व चाचणी किंवा मुलाखत फेरी. प्रक्रियेनुसार, UPSC IAS अंतिम निकाल 2022 मध्ये निवडलेल्या या उमेदवारांची निवड आयोगाने व्यक्तिमत्व चाचणीनंतर केली आहे जी IAS निवड प्रक्रियेचा शेवटचा टप्पा आहे.
हेही वाचा :