ठाणे - जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाने ( Untimely in Thane ) सोसाट्याच्या वाऱ्याने हजेरी लावली आहे. पावसाच्या जोरदार सरी बरसल्याने हवामानात आणखीच गारवा वाढला असून अचानक शनिवारी सायंकाळच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसाने नागरिकांसह दुचाकीस्वारांची त्रेधातिरपीट उडाली आहे. तर ग्रामीण भागात भाजीपाला लागवड केलेल्या शेतीवर या अवकाळी पावसाचा परिमाण झाल्याचे सांगण्यात येत आहे. आधीच कोरोना व ओमायक्रोनचा धोका असतानाच त्यामध्ये साथरोगांची भर पडणार आहे.
या जिल्ह्यात पावसाची शक्यता -
पुढील २४ तासामध्ये या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता ( Rain will fall in maharashtra ) आहे. ८ जानेवारीनंतर राज्यामध्ये हळुहळू पावसाचा जोर वाढणार आहे. उद्यापासून नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर ८ आणि ९ जानेवारीला मात्र उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भामध्ये अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळणार आहे.
जिल्ह्यात दोन दिवस ढगाळ वातावरण -
जोरदार विजेच्या कडकडाटसह अवकाळी पावसाने संध्याकाळच्या सुमारास कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, कल्याण ग्रामीण मुरबाड आणि शहापूरसह भिवंडीच्या ग्रामीण भागात हजेरी लावली. जिल्ह्यात दोन दिवसापासून ढगाळ वातावरण असल्याने जिल्ह्यात विविध ठिकाणी विशेषतः शहरी भागासह ग्रामीण भागात पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. अखेर शनिवारी संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरण थोडे अल्हाददायक होऊन गारवा पसरला होता.
विविध आजारांनी अवकाळी पावसामुळे निमंत्रण -
अवकाळी पाऊस पडतांना वीजा देखील चमकत होत्या. त्यातच हिवाळ्यातील गारठ्याने नागरिक रात्रीच्या वेळी कुडकडत असतानाच या अवकाळी पाऊस असल्याने अधिक गारठा वाढण्याची भीती आता नागरिक व्यक्त करत करण्यात आली असून विविध आजारांनी हा अवकाळी पाऊस निमंत्रण देणार असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे थंडीचे वातावरण असताना अचानक पावसाने हजेरी लावल्याने त्यात सोसाट्याचा वारा आणि सुटसुटीत असल्याने थंडगार वातावरणामुळे सर्दी खोकला असलेल्या नागरिकांना या पावसामुळे अधिकच त्रास सोसावा लागणार आहे. त्यात लहान मुलांनाही सर्दी व खोकलाची साथ आल्याचे दिसून येत, असल्याने खाजगी रुग्णालयात अशा रुग्णांची संख्या वाढली आहे. तर पावसामुळे काही भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता. सायंकाळी सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकाणी सखल भागातील रस्त्यावर पाणी साचले आहे.
हेही वाचा - Earthquake at Koyna Dam : कोयना धरण परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का