ETV Bharat / state

भाजपबरोबर युती करुनच आमचे काही नगरसेवक निवडून येतील- केंद्रीय मंत्री आठवले

author img

By

Published : Feb 22, 2021, 6:46 AM IST

Updated : Feb 22, 2021, 7:05 AM IST

मंत्री रामदास आठवले यांनी 25 जागांची मागणी करत नवी मुंबई मनपा निवडणुकीत भाजपसोबत युती करणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच यावेळी त्यांनी भाजपा आमदार गणेश नाईक यांच्या गुन्हेगारी जगतातील डॉनशी संबध असल्याच्या वक्तव्यावरही त्यांनी मत व्यक्त केले.

ramadas athawle
केंद्रीय मंत्री आठवले

नवी मुंबई - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाशी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. मेळाव्यात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी 10 जागांची मागणी करत नवी मुंबई मनपा निवडणुकीत भाजपसोबत युती करणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच यावेळी त्यांनी भाजपा आमदार गणेश नाईक यांच्या गुन्हेगारी जगतातील डॉनशी संपर्क असल्याच्या वक्तव्यावरही त्यांनी मत व्यक्त केले.

आमचे आठ ते दहा उमेदवार निवडून येतील-
नवी मुंबई महापालिका निवडणुकीत आरपीआयने 25 जगांची मागणी केली आहे. आम्ही जास्त जागांची मागणी करणार नाही, जितके उमेदवार निवडून येऊ शकतात तितक्याचे जागा आम्ही मागत आहोत. तसेच भाजपासोबत युतीकरूनच आमचे किमान आठ ते दहा उमेदवार निवडून येऊ शकतात, असा विश्वास मंत्री आठवले यांनी व्यक्त केला.
केंद्रीय मंत्री आठवले

गणेश नाईकांचे इंटरनॅशनल डॉन बरोबर संबंध नसावेत-

गणेश नाईक यांनी 'जगभरात असलेल्या इंटरनॅशनल डॉनला देखील गणेश नाईक कोण आहे हे माहित आहे' हे वक्तव्य केले होते. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी गणेश नाईकांचे जर इंटरनॅशनल डॉन बरोबर संबंध असतील तर त्यांची चौकशी करावी, त्यासाठी हा प्रश्न मी संसदेत मांडणार असल्याचे म्हटले होते. त्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना आठवले म्हणाले, की गणेश नाईक यांना मी बऱ्याच वर्षापासून ओळखतो, मला नाही वाटत की त्यांचे इंटरनॅशनल डॉन बरोबर संबंध असावेत, त्यांनी बोलता बोलता हे वक्तव्य केले असेल त्यांना कोणी धमकी देत असेल धमकावत असेल तर त्यांना प्रत्युत्तर देताना त्यांनी असे वक्तव्य केले असावे असेही मत यावेळी आठवले यांनी व्यक्त केले.

अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांच्या सुरक्षेसाठी रिपब्लिकन पक्ष पुढे येईल-

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाच्या शूटिंग होऊ देणार नाही, असे वक्तव्य केले होते. मात्र महाराष्ट्रात गुंडाराज नाही. नाना पटोले यांनी जर अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग बंद करण्याचा प्रयत्न केला, तर रिपब्लिकन पक्ष त्यांच्या सुरक्षेसाठी पुढे येईल, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.

Last Updated : Feb 22, 2021, 7:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.