ठाणे : तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सरकारने मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाचा रस्ता विकला आणि ८ हजार कोटी खिशात घातले, मात्र हा पैसे राज्यातील विकास कामासाठी खर्च होणार आहे. वरळी बांद्रा या सगळ्या प्रोजेक्ट मद्धे मजबूरी ही होती बजेट कमी होते. मात्र मी बजेटवर अवलंबून नाही, मी कॅपिटल मार्केटमधून पैसे उभे करतो. या पुढे तर हिंदुस्थानचे इन्फ्रास्ट्रकचर ( India infrastructure built ) गरीब माणसांच्या पैशातून उभे करायचे आहे. जो रिटायर पेंशनर, कॉन्स्टेबल आहे, जो नोकरी करतो त्याला८ टक्के रिटर्न द्यायचे आणि त्याच्या पैशातुन हाय वे बांधायचे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Union Minister Nitin Gadkari ) यांनी कल्याणात केले.
बॅंकेचे 50 व्या वर्षात पदार्पण : दि कल्याण जनता सहकारी बँक ५० व्या वर्षात पदापर्ण करत असून बँकेच्या वर्धापनदिनानिमित्त कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी , कोकण प्रांत संघचालक सतीश मोढ उपस्थित होते.
पण सरकार जवळ पैशांची कमी होती : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढे म्हणाले कि, १९९५ साली मंत्री असताना त्यावेळेस तेराशे कोटीचे बजेट होते. ठाणे भिवंडी बायपास हा पहिला रस्ता बीओटीवर केला होता. तेव्हा मला प्रश्न विचारला रस्ते बीओटीवर काढता मग सरकार बीओटीवर का देत नाही. पण सरकार जवळ पैशांची कमी होती. त्यावेळेस पब्लिक बाँड मध्ये गेलो हे सगळे रस्ते पूल केले व त्याचे पैसे वसूल झाले. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बँक प्रशासनाचे कौतुक करताना काही सूचना दिल्या.
कर्जावरील व्याजदरात सवलतीची मागणी : येणाऱ्या काळात समाजाला सुखी समृध्दी करायचं असेल तर समाजाला ध्वनी प्रदुषण, जल प्रदूषण आणि वायू प्रदूषणापासून मुक्त केले पाहिजे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कल्याणात केले. पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, यांनी दिल्लीमध्ये गेल्यावर दोन दिवसात तब्येत बिघडते. आता मी ट्रान्सपोर्टचा मिनिस्टर असल्याने हातात दांडा घेवून बसलोय. पेट्रोल डिझेलचा वापर कसा कमी होईल याकडे लक्ष देतोय. तुम्ही वाहनांना लोन देता मात्र जर शक्य झाले तर ग्रीन फ्युअल किंवा इलेक्ट्रिक वाहनावरील कर्जावरील व्याजदरात थोडी सवलत द्या, अशी विनंती बँकेला केली. चार वर्षात पेट्रोल डिझेलचा वापर कमी होईल, असा विश्वास आहे.
सर्वांना एसी बसचा प्रवास शक्य : दिल्लीत माझ्याकडे हायड्रोजनची गाडी आहे. १०० तक्के इथोनोलवर चालणारी गाडी आहे. मी या गाडीमधून मुख्यमंत्र्यांना फिरवतो. त्यांना सांगतो तुमच्या राज्यातील पेट्रोल डिझेल बंद करा, मुंबई चालणारी एक इलेक्ट्रिकची बस नॉन एसी ३९ रुपये किलोमीटर ,एसी ४१ रुपये पर किलोमीटर आणि बेस्ट ची डिझेल बस ११५ रुपये पर किलोमीटर, त्यामुळे मुंबई ठाणे कल्याण मध्ये फिरणाऱ्या सर्व बस इलेक्ट्रिक झाल्या तर ३० तक्के भाडे कपात करून सगळी जनताएसी बसमध्ये फिरू शकते, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.