ETV Bharat / state

Ulhasnagar Towing Service : टो केलेली दुचाकी परत मिळवण्याच्या नादात तरुण गंभीर; Watch CCTV - उल्हासनगर पोलीस

टो केलेली आपली दुचाकी परत मिळवण्याच्या नादात एका तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. याप्रकारामुळे टोईंग व्हॅन सध्यातरी वाहतूक विभागाने बंद ठेवली आहे. याप्रकरणात राजकीय नेत्यांनीही उडी घेतली आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jul 17, 2023, 10:14 PM IST

Updated : Jul 17, 2023, 10:54 PM IST

सीसीटीव्ही आणि जखमी तरुण, दुकानदारांची प्रतिक्रिया

ठाणे : उल्हासनगर वाहतूक विभागाने टो केलेली दुचाकी परत घेण्यासाठी टोईंग व्हॅनकडे धावत सुटलेल्या त्या तरुणाचा दुकानासमोर ठेवलेल्या जाळीत पाय अडकून समोरील रीक्षावर आदळल्याने तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेला सर्वोतोपरी वाहतूक विभाग जबाबदार असल्याचे चित्र राजकीय नेते मंडळी रचू लागल्याने काही दिवस टोइंग बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. विनय भोईर असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या डोक्याला २२ टाके पडले आहेत. मात्र, या घटनेची नोंद मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या केवळ स्टेशन डायरीत करण्यात आल्याने पोलीस नेमके कोणाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशी चर्चे शहारत रंगली आहे.

जाळीत अडकला विनयचा पाय - उल्हासनगर कॅम्प नंबर 3 च्या 17 सेक्शन भागातील भाऊसाहेब मेहेरबान सिंग चौकात मोबाईल झोन हे दुकान आहे. या दुकानाच्या बाहेर 15 जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास विनय भोईर हा तरुण दुचाकीवरून आला. त्याला त्याच्या मोबाईलची स्क्रीन गार्ड काच बदलायची होती. त्याने त्याची दुचाकी दुकानासमोर पार्किंग फुल असल्याने दुसऱ्या उभ्या दुचाकीच्या मागे त्याची दुचाकी लावली होती. .या दुचाकीमुळे वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे गस्तीवर असलेल्या टोईंग व्हॅनच्या कर्मचाऱ्यांनी त्याची दुचाकी टो करत व्हॅनमध्ये टाकली होती. त्यावेळी ही बाब बाजूच्या दुकानदाराने भोईर याला सांगताच, भोईर याने तत्काळ दुचाकी मिळविण्यासाठी धाव घेतली. त्यावेळी दुकानाबाहेर दुकानदाराने लावलेल्या जाळीत विनयचा पाय अडकला आणि त्याचवेळी समोरून येणाऱ्या रिक्षावर आदळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

टॉईंग व्हॅन काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय - या घटनेनंतर टोईंग वाहनावरील पोलीस कर्मचाऱ्याने तत्काळ खाली उतरून विनयला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुचाकी टॉईंग करताना कोणतीही अनाउन्समेंट न करता टोईंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांनी घाईगडबडीत उचलली. त्यामुळे ही घटना घडल्याचा कयास लावत वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर या घटनेला सर्वोतोपरी वाहतूक विभाग जबाबदार असल्याचा आरोप नेत्यांनी केला. तर भाजप आमदार कुमार आयलानीने थेट वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त याना तक्रार केल्याने पोलीस निरीक्षक विजय गायकवाड यांनी टॉईंग व्हॅन काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

दुकानासमोर का ठेवली जाते जाळी - उल्हासनगरच्या दुकानदारांनी मुजोरी दाखवत रस्त्यावरील फुटपाथ हे देखील अडविले आहेत. त्यांच्या दुकानासमोर वाहनचालकांनी गाड्या लावल्यास दुकानात यायला जागा शिल्लक राहत नाही. त्यामुळे दुकानदारांनी त्यांच्या दुकानाबाहेर लोखंडी जाळ्या टाकून येण्या जाण्यासाठी मार्ग तयार केला आहे. या जाळ्यांमध्ये पाय अडकून पडल्याने अनेक दुर्घटना घडत असतात.

डबल पार्किंगचा वाहतूक कोंडी करणारा फंडा - उल्हासनगर शहरातील बाजारपेठेतील रस्ते हे अरुंद आहेत. तसेच दुकानांची रुंदी देखील कमी आहे. एका दुकानात मालकासह दोन पेक्षा अधिक नोकर वर्ग काम करतो. यामुळे त्यांच्याच दोन ते तीन गाड्या दुकानासमोर असलेल्या पार्किंगमध्ये दुकान उघडल्यापासून बंद होईपर्यंत उभ्या असतात. उर्वरित जागा लोखंडी जाळ्या अडवतात. त्यामुळे ग्राहकांना दुचाकी पार्क करण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही. परिणामी ग्राहक हा पुढे मागे पार्किंग शोधण्याचा प्रयत्न न करता गाडी डबल पार्किंग करून निघून जातो. अश्या गाड्या वाहतूक विभाग उद्घोषणा न करताच उचलतो, कारण त्या वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत असतात.

विनयच्या अपघातात नक्की चूक कोणाची - विनय भोईरने त्याची दुचाकी डबल पार्किंगमध्ये उभी केली आणि तो दुकानात गेला. त्यानंतर तिथे आलेल्या टॉईंग व्हॅनने वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारी गाडी तत्काळ हटवत कर्तव्य बजावले. मात्र, त्यांनी Announcement केली नसल्याचा आरोप दुकानदार करत आहेत. दुकानदाराने दुकानासमोर भलीमोठी लोखंडी जाळी ठेवली होती, त्यात पाय अडकून विनय पडला. त्याचवेळी समोर आलेल्या रिक्षावर आदळला. या संपूर्ण प्रकरणात समाजसेवी आणि राजकीय पक्ष हे व्यापाऱ्यांच्या मतासाठी डबल पार्किंग कायदेशीर असल्याप्रमाणे वाहतूक पोलिसांना कौसत आहेत. मात्र, ज्या जाळीत विनय पाय अडकून पडला, त्या जाळीच्या मालकाला काही एक बोलताना दिसत नाहीत. भोईरने डबल पार्किंग केलीच नसती तर ही घटना घडली नसती, त्यामुळे सर्वांनी पार्किंगच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

Last Updated : Jul 17, 2023, 10:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.