ठाणे : सुनीता मरोठीया असे मुख्य सूत्रधार असलेल्या अटक वहिनीचे नाव आहे. तर योगेंद्र उर्फ भोला मरोठीया, गणेश उर्फ शालू मरोठीया असे अटक केलेल्या पुतण्याचे नाव असून तिसरा आरोपी हा जावई आकाश वाल्मिकी आहे. त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. तर मनवीर मरोठीया असे हत्या झालेल्या दिराचे नाव आहे. जखमी पती-पत्नीचे नाव रामपाल करोतीया आणि राखी करोतिया आहे.
संपत्तीवरून उद्भवले भांडण : मिळालेल्या माहिती नुसार, मृतक मनवीर मरोठीया हे उल्हासनगर शहरातील फार्व्हर लाईन भागात सहकुटुंब राहत होते. अनेक दिवसांपासून मृत मनवीर आणि त्यांच्या मरोठीया कुटुंबात संपत्तीवरून वाद सुरू होते. याच वादातून २४ एप्रिल रोजी आरोपी वहिनीशी मृतक दिरासोबत जोरदार भांडण झाले होते. त्यावेळी भांडणात बेदम मारहाण झालेल्या आरोपी वहिनीला जखमी अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्याचवेळी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच आरोपी वहिनीने तिच्या दोन मुलांसह जावयासोबत दिराच्या हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
असा रचला कट : हत्येचा कट रचल्याप्रमाणे ३१ मार्च रोजी सकाळच्या सुमारास मृत मनवीर हे कामावर जात असतानाच, आधीच घात लपून बसललेल्या दोन पुतणे आणि जावई या तिघांनी फार्व्हर लाईन चौकात मनवीर यांना गाठून त्यांच्यावर तलवार आणि लाकडी दांडक्याने हल्ला करून जागीच ठार केले. शिवाय मनवीर सोबतच कामावर जाणारे रामपाल करोतिया, राखी करोतिया यांच्यावरही हल्लेखारांनी जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यात मनवीर यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर संपत्तीच्या वादात मध्यस्थी करणारे रामपाल आणि राखी करोतिया यांच्यावर हल्ला झाल्याने ते जखमी झाले.
मुख्य सुत्रधारास अटक : या घटनेची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात रवाना केला. तीन हल्लेखोरांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. तीन हल्लेखोर हे फरार झाले होते. त्यांच्या शोधासाठी उल्हासनगर क्राईम ब्रांच आणि मध्यवर्ती पोलीस पथकाने शोध घेऊन मुंबईतील विलेपार्ले भागातून काकाची हत्या करणाऱ्या दोन्ही पुतण्यांना पाच तासातच अटक केली. त्यांच्या अटकेनंतर मनवीर यांच्या हत्येच्या कटात मुख्य सूत्रधार असलेल्या वहिनी सुनीताला कालच शासकीय रुग्णालयातून डिचार्ज दिल्यानंतर तिला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे.