ETV Bharat / state

Thane Crime : उल्हासनगरमध्ये मोबाईल हिसकावून तरुणावर धारधार शस्राने हल्ला, उपचारा दरम्यान मृत्यू - उल्हासनगर मुलाची हत्या

उल्हासनगर शहरात शौचालयासाठी घराबाहेर निघालेल्या एका तरुणाचा ( Young Boy Murder In Ulhasnagar ) गुरुवारी रात्रीच्या सुमारास दोघा हल्लेखोरांनी मोबाईल हिसकावून त्याच्यावर धारधार शस्त्राने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, आज मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू ( Ulhasnagar Boy Death In JJ Hospital ) झाला आहे.

Young Boy Murder In Ulhasnagar
Young Boy Murder In Ulhasnagar
author img

By

Published : Apr 11, 2022, 9:11 PM IST

ठाणे - उल्हासनगर शहरात शौचालयासाठी घराबाहेर निघालेल्या एका तरुणाचा ( Young Boy Murder In Ulhasnagar ) गुरुवारी रात्रीच्या सुमारास दोघा हल्लेखोरांनी मोबाईल हिसकावून त्याच्यावर धारधार शस्त्राने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, आज मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू ( Ulhasnagar Boy Death In JJ Hospital ) झाला आहे. मुन्नीलाल जस्वार असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मोबाईल हिसकावून धारधार शस्त्राने वार - उल्हासनगर कॅम्प नंबर ३च्या जिरा चौकात मृत मुन्नीलाल जस्वार शौचालयासाठी गुरुवारी रात्रीच्या सुमारास घराबाहेर जात होते. त्यावेळी दोन अज्ञात हल्लेखोरांनी भररस्त्यात मोबाईल हिसकावून अचानक धारधार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले होते. या हल्ल्यात त्यांच्या डोक्यावर, पाठीवर, बरगाड्यांवर वार झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. सुरूवातीला मृत मुन्नीलाल याला उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर क्रिटीकेअर रुग्णालयातून पुढील उपचारासाठी मुंबई तील जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले होते. परंतु आज मुन्नीलाल याची मृत्यूशी झुंज संपली आहे. आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद - याप्रकरणी आज मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अज्ञात दोन हल्लेखोरांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात येणार असून या हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची ३ पथके रवाना झाली आहे. विशेष म्हणजे हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद झाले असून लवकरच त्यांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे.

हेही वाचा - Rashmi Shukla Phone Tapping Case : रश्मी शुक्लांकडून राऊत, खडसेंचा 127 वेळा फोन टॅप?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.