ETV Bharat / state

Uddhav Thackeray Mumbra Visit : दम असेल तर समोर या; उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला आव्हान

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 11, 2023, 7:08 PM IST

Updated : Nov 11, 2023, 10:51 PM IST

Uddhav Thackeray Mumbra Visit : शिंदे गटानं बुलडोझरचा वापर करून शिवसेनेची शाखा उद्ध्वस्त केली. खरा बुलडोझर काय असतो हे दाखवण्यासाठी मी आलो आहे. मात्र, पोलिसांनी या चोरांना संरक्षण दिल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Mumbra Visit
उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

ठाणे Uddhav Thackeray Mumbra Visit : खरा बुलडोझर काय असतो, हे दाखवण्यासाठी मुंब्य्रात आल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. हिंमत असेल, तर पोलिसांना बाजूला करून पुढं या, असं थेट आव्हान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला दिलं. या चोरट्यांना आज पोलिसांनी संरक्षण दिलं, मात्र या चोरट्यांनी मधमाशीच्या पोळ्यात हात घातलाय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आगामी निवडणुकीत या चोरांचं डिपॉझिट जप्त करण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केलं.

दम असेल तर समोर या : ही शाखा आमची आहे, तिची सर्व कागदपत्रं आमच्याकडं आहेत. आज त्यांनी भाडोत्री आणून त्यांना बॅरिकेड्सच्या मागं उभं केल्याचा आरोप ठाकरे यांनी केलाय. तुमच्यात दम असेल तर समोर या, आम्ही तयार आहोत. ही शाखा आमच्याकडेच राहणार असून या ठिकाणी शिवसैनिक रोज उभे राहतील, असंही ते म्हणाले. शिंदे गटानं मुंब्रा येथील शाखा ताब्यात घेतल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी त्या ठिकाणी भेट दिली. या शाखेपासून उद्धव ठाकरे अवघ्या 10 ते 20 मीटर अंतरावर होते. त्यावेळी दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी झाली. परिस्थिती पाहून पोलिसांनी उद्धव ठाकरेंना या शाखेत न जाण्याचं आवाहन केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माघारी फिरून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

दोन्ही गटांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी : उद्धव ठाकरे यांच्या मुंब्रातील भेटीवेळी दोन्ही गटात खडाजंगी झाली. दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यानं एकच गोंधळ उडाला. तसंच राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र अव्हाड हेही यावेळी आक्रमक झाल्याचं दिसून आलं. मुंब्र्यातील ज्या शाखेला भेट देण्यासाठी उद्धव ठाकरे आले आहेत, त्या शाखेजवळ न जाण्याचं आवाहन पोलिसांनी उद्धव ठाकरेंना केलं होतं.

नेमका काय वाद? : मुंब्य्रात शिवसेनेची शाखा होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर राज्यात शिंदे तसंच ठाकरे गट असे दोन भाग झाले. त्यानंतर दोन्ही गटांकडून शाखांवर दावा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून दोन्ही गटांनी मुंब्रा येथील शाखेवर दावा केलाय.

हेही वाचा -

  1. Eknath Khadse : तर, माझं विमान कायमचं लॅंड झालं असतं, मुख्यमंत्र्यांशी बोलताना एकनाथ खडसे भावूक
  2. Sharad Pawar On Diwali : पवारांची दिवाळी! माणसांच्या आयुष्यामध्ये चढ-उतार येतात,संकटांना तोंड द्यावं लागतं - शरद पवार, पाहा व्हिडिओ
  3. Vikas Lawande On Sharad Pawar : 'नामदेव जाधव तोतया'; शरद पवार मराठा की ओबीसी, पाहा काय म्हणाले विकास लवांडे

Last Updated : Nov 11, 2023, 10:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.