ETV Bharat / entertainment

'तौबा-तौबा' गाणं 1 वर्षाच्या चिमुरडीला भावलं, व्हिडिओ पाहून विकी कौशलही झाला चकित - VICKY KAUSHAL - VICKY KAUSHAL

Vicky Kaushal Youngest Fan: विकी कौशल स्टारर 'बॅड न्यूज' चित्रपटातील 'तौबा-तौबा' गाणं सध्या ट्रेंडमध्ये आहे. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. यामध्ये एका वर्षाच्या चिमुरडीला 'तौबा-तौबा' गाण्याची क्रेझ असल्याचं दिसत आहे.

Vicky Kaushal Youngest Fan
विकी कौशलची यंगेस्ट फॅन (विकी कौशल तौबा-तौबा सॉन्ग (ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2024, 2:57 PM IST

मुंबई Vicky Kaushal Youngest Fan : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा 'बॅड न्यूज' चित्रपट हा जुलैमध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील 'तौबा-तौबा' हे गाणं प्रचंड गाजलं होतं. यावर अनेकांनी रिल्स बनवून आपल्या सोशल मीडिया पेजवर शेअर केल्या होत्या. हे गाणं आजही ट्रेंडमध्ये आहे. नुकताच या गाण्यावरील सोशल मीडियावर एका चिमुरडीचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ती 'तौबा-तौबा' म्हणताना दिसत आहे. या व्हिडिओनं सोशल मीडिया यूजर्सची मनं जिंकली आहेत. आता या व्हिडिओवर विकी कौशलनं देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. विकी कौशलच्या सर्वात यंगेस्ट फॅनला एक महिला विचारते, 'तुला कोणतं गाणं ऐकायला आवडेल?' यावर ती चिमुरडी गोड आवाजात 'तौबा-तौबा' म्हणते. या व्हिडिओमध्ये चिमुरडीचे असे काही क्षण दाखवण्यात आले आहेत, ज्यात ती बाललीला करत सहजपणे 'तौबा-तौबा' म्हणताना दिसत आहे.

Vicky Kaushal Youngest Fan
विकी कौशलची यंगेस्ट फॅन (Vicky Kaushal - Instagram)

विकी कौशलची यंगेस्ट फॅन : मुलीचा गोंडसपणा हा यूजर्संना आवडला आहे. याशिवाय तिचा क्यूटनेस पाहून विकी कौशलही स्वतःला प्रतिक्रिया देण्यापासून रोखू शकला नाही. 30 सप्टेंबर रोजी, विकीनं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर या यंगेस्ट फॅनचा व्हिडिओ पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये रेड हार्ट आणि इमोजीसह 'हे' लिहिलं. चिमुरडीचा व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ खूपच अप्रतिम आहे. अलीकडेच, विकीनं अबुधाबी येथे आयोजित आयफा 2024 ( IIFA 2024) अवॉर्ड्समध्ये शाहरुख खानसह कार्यक्रम होस्ट केला. 'किंग खान'बरोबर विकीनं प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं.

विकी कौशलनं शेअर केले फोटो : विकी आणि 'किंग खाननं 'बॅड न्यूज' या चित्रपटामधील 'तौबा तौबा', 'डुप्लिकेट' चित्रपटातील हिट गाणं 'मेरे मेहबूब मेरे सनम' आणि 2021च्या सुपरहिट तेलुगू चित्रपट 'पुष्पा: द राइज'मधील लोकप्रिय गाणं 'ऊ अंतावा ऊ ऊ अंतावा'वर डान्स केला. विकीनं आयफामधून शाहरुख खानबरोबरचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत. यावर त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'लहानपणापासून त्याला स्टेजवर होस्ट आणि परफॉर्म करताना पाहात आहे. काल रात्री स्टेज शेअर करणं आणि या जादूचा एक भाग बनण्याचं स्वप्न मी पाहिलं होतं. धन्यवाद शाहरुख सर. तुमच्यासारखा कोणी नाही आणि कधीच नसेल." आता त्याच्या या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा :

  1. रणबीर कपूर आलिया भट्ट, विकी कौशल स्टारर 'लव्ह अँड वॉर'ला मिळाली नवीन रिलीज तारीख - Love and War Release Date
  2. लालबागच्या राजाला भेट देताना विकी कौशलला चाहत्यांनी सेल्फीसाठी धरलं वेठीस - Vicky Kaushals video viral
  3. चांगली बातमी 'बॅड न्यूज' ओटीटीवर रिलीज - Vicky Kaushal and Tripti Dimri

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.