नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील खारघर येथे एका ट्रॅव्हल्सच्या बसचा टायर फुटल्याने अपघात झाला आहे. यामध्ये 8 ते 10 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
साई ट्रॅव्हल्स नावाची बस जालन्याहून मुंबईला चालली होती. यावेळी बसच्या डाव्या बाजूचा टायर फुटला. चालकाने गाडी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र अपघात टळला नाही. या बसमध्ये 40 ते 45 पेक्षा अधिक प्रवासी होते. यातील 8 ते 10 जणांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना जवळील रुग्णालयात नेण्यात आले आहे.
खारघरजवळील सायन पनवेल महामार्गावर हा प्रकार घडल्याने काही काळ वाहतुक विस्कळीत झाली होती. सकाळी साडे आठच्या सुमारास झालेल्या अपघातामुळे काही वेळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत परिस्थिती नियंत्रणात आणली.