ETV Bharat / state

दुचाकीला किक मारताच दुचाकीस्वार घुसला फोटो स्टुडिओत; घटना सीसीटीव्हीत कैद - दुचाकीस्वार पोहचला दुकानात

हर्षित डिजिटल फोटो स्टुडिओ आहे. एक तरुण दुचाकीवर कामानिमित्ताने आला होता. त्यावेळी याच फोटो स्टुडिओ समोरच्या रस्त्यावर त्याने दुचाकी उभी केली होती. काही वेळाने काम आटपून पुन्हा दुचाकीस्वार दुचाकी बसला आणि दुचाकीला किक मारून दुचाकीचा गेयर टाकताच नियंत्रण सुटलेली बाईक दुचाकीस्वारासह थेट फोटो स्टुडिओ घुसली.

दुचाकीस्वार
दुचाकीस्वार
author img

By

Published : Oct 29, 2021, 6:51 AM IST

Updated : Oct 29, 2021, 6:58 AM IST

ठाणे - रस्त्यावर उभी असलेल्या दुचाकीला तरुणाने किक मारून दुचाकीचा गेयर टाकला. त्यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने काही सेंकदाच्या क्षणात बाईकसह थेट फोटो स्टुडिओत तो तरुण घुसला होता. त्यावेळी फोटो स्टुडिओत असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अपघाताचा थरार कैद झाला. मात्र या अचानक घडलेल्या अपघातातून फोटो स्टुडिओमधील एक फोटोग्राफर सुदैवाने बचावला आहे. ही घटना भिवंडी शहरात घडली आहे.

दुचाकीला किक मारताच दुचाकीस्वार घुसला फोटो स्टुडिओत

नियंत्रण सुटलेल्या बाईकसमोर आला फोटोग्राफर

भिवंडी शहरातील वंजारपट्टी भागात पटेलनगरमध्ये हर्षित डिजिटल फोटो स्टुडिओ आहे. एक तरुण दुचाकीवर कामानिमित्ताने आला होता. त्यावेळी याच फोटो स्टुडिओ समोरच्या रस्त्यावर त्याने दुचाकी उभी केली होती. काही वेळाने काम आटपून पुन्हा दुचाकीस्वार दुचाकी बसला आणि दुचाकीला किक मारून दुचाकीचा गेयर टाकताच नियंत्रण सुटलेली बाईक दुचाकीस्वारासह थेट फोटो स्टुडिओ घुसली. त्यावेळी हर्षित डिजिटल फोटो स्टुडिओत काम करणारा एक फोटोग्राफर काऊंटरवर मोबाइल बघत उभा असतानाच अचानक बाईक समोर आला होता.

डिजिटल फ्लॅश व इतर साहित्याचे नुकसान

खळबळजनक बाब म्हणजे बाईकस्वारने गेयरमध्ये बाईक सुरू केली असता लागलीच सुरू झाली. त्यामुळे बाईकचा वेग अधिक वाढल्याने दुचाकीस्वारने ब्रेक दाबण्याच्या प्रयत्नात एक्सलेटर जोरात फिरविल्याने बाईकवरील ताबा सुटला होता. या अचानक घडलेल्या अपघातात स्टुडिओमधील डिजिटल फ्लॅश व इतर साहित्याचे नुकसान झाले.

समाजमाध्यमांवर सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

जेवढ्या वेगाने हा अपघात झाला तेवढ्याच वेगाने समाज माध्यमांवर अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले. मात्र या घटनेनंतर बाईकस्वारने माफी मागून स्टुडिओमधील झालेले नुकसान भरपाईची हमी दिल्याने स्थानिक पोलीस ठाण्यात अपघाताची तक्रार फोटो स्टुडिओच्या मालकाने दिली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - यावर्षी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकूण ५ हजार २२१ कोटींची मदत - विजय वडेट्टीवार

Last Updated : Oct 29, 2021, 6:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.