ETV Bharat / state

Anti ISIS operation In Bhiwandi: 'आयसिस' दहशतवादी संघटनेच्या दोघांना भिवंडी नजीकच्या पडघा-बोरिवलीतून अटक - भिवंडीत आयसीस विरोधी कारवाई

'एनआयए' अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेच्या गुप्तचर यंत्रणेच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने ठाणे जिल्ह्यातील भिवंडी (Anti ISIS operation In Bhiwandi) तालुक्यातील पडघा-बोरिवली गावात एका खोलीवर छापेमारी केली. यामध्ये 'आयसिस' दहशतवादी संघटनेच्या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.

Anti ISIS operation In Bhiwandi
एनआयएची कारवाई
author img

By

Published : Jul 7, 2023, 7:12 PM IST

ठाणे: सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, 'एनआयए'च्या पथकाने सोमवारी पहाटेच्या साडेचार वाजल्याच्या सुमारास भिवंडी तालुक्यातील पडघा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या (Anti ISIS operation In Bhiwandi) हद्दीत एका खोलीवर अचानक धाड टाकली होती. (two ISIS supporters arrested) या धाडी दरम्यान ताब्यात घेण्यात आलेले शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला हे दोघे अनेक दिवसापासून याच भाड्याच्या खोलीत राहत असल्याचे तपासात समोर आले आहे. (NIA raid in Padgha Borivali) तर याच दिवशी मुंबईतील नागपाडा परिसरातून ताबीश नासेर सिद्दीकी याला अटक केली. यासह पुणे शहरातील कोंढवा भागातून जुबेर नूर मोहम्मद शेख अबू नुसैबा याला अटक केली आहे.

शस्त्र बनविण्याचे घेतले प्रशिक्षण : माहितीनुसार, 'एनआयए' अधिकाऱ्यांच्या तपासात अटक केलेल्या चारही जणांनी त्यांच्या साथीदारांसह आयसिसमध्ये काही तरुणांची भरती केल्याचे समोर आले. या चौघांनी 'आरडीएक्स' आणि शस्त्रे बनवण्याचे प्रशिक्षण तरुणांना दिले असून आरोपींनी 'डू इट युवरसेल्फ किट्स' यासह संबंधित सामग्री देखील आपापसात सामायिक केली होती. ज्यात 'आयईडी' बनवणे आणि लहान शस्त्रे, पिस्तूल इत्यादी बनवणे, आदी माहिती होती. त्याशिवाय, त्यांच्या परदेशस्थित 'आयसीस' या हँडलर्सच्या निर्देशानुसार, आरोपींनी दहशतवाद आणि हिंसाचाराच्या अजेंड्याला पुढे नेण्यासाठी 'व्हॉईस ऑफ हिंद' या मासिकात प्रक्षोभक मीडिया सामग्री देखील तयार केली होती, असेही 'एनआयए'ने म्हटले आहे. (two ISIS supporters arrested) शरजील शेख (वय ३५) आणि झुल्फिकार अली बडोदावाला (वय ३६) असे अटकेतील दोघांची नावे आहेत. (NIA raid in Padgha Borivali) विशेष म्हणजे एकाच दिवशी पहाटेच्या सुमारास मुंबई, ठाणे आणि भिवंडी तालुक्यातील पडघा-बोरीवली या तीन ठिकाणी छापेमारीत करत चार जणांना आतापर्यंत 'एनआयए'च्या पथकाने अटक केली आहे.

आयसिसशी संबंधित कागदपत्रे जप्त: २८ जून २०२३ रोजी 'एनआयए' पथकाने नोंदवलेल्या 'आयसीआयएस महाराष्ट्र मॉड्यूल' प्रकरणात पाच ठिकाणी संशयितांच्या घरांची झडती घेण्यात आली होती. त्यावेळीही 'एनआयए' पथकाने आरोपींच्या घरांच्या झडती वेळी काही इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि आयसिसशी संबंधित अनेक कागदपत्रे आणि साहित्य जप्त केले होते. जप्त केलेल्या साहित्याने आरोपींचे आयसिस या दहशतवादी संघटनेशी सक्रिय संबंध आणि दहशतवादी संघटनेच्या भारतविरोधी अजेंडा पुढे नेण्यासाठी असुरक्षित तरुणांना प्रवृत्त करण्याचे त्यांचे प्रयत्न केल्याचे स्पष्टपणे समोर आल्याचे सांगण्यात आले.

भिवंडी, मुंब्रा देशविघातक कृत्यांचा गड? गेल्याच वर्षी भिवंडी शहरातून देशविघातक व दहशतवादी कृत्यात सहभागी असलेल्या 'पीएफआय'च्या तीन पदाधिकाऱ्यांना अटक केली होती. शिवाय मुंब्रा भागातूनही गेल्या दोन वर्षांत संशयिताना ताब्यात घेऊन अटक केली होती. तर २०१४ साली कल्याण मधून चार तरुण आयसिसमध्ये भरती झाले होते. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात आजही देशविघातक कारवायांसाठी काही जण सक्रिय असल्याचे पुन्हा एकदा या कारवाईनंतर स्पष्ट झाले.

हेही वाचा:

  1. Beed Crime: कॅफेवर मुलींचे फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीला नागरिकांनी दिला चोप
  2. Satara Crime : पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कातील सातार्‍याचा आयटी इंजिनिअर; जिल्ह्यात खळबळ
  3. Bhandara Crime: क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक; दोन आरोपींवर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.