ETV Bharat / state

ठाण्यात रूग्णाच्या नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून याबाबत नारपोली पोलिसांनी मारहाण करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. रुग्णाच्या नातेवाईकांना (आयसीयू) अतिदक्षता विभागात प्रवेश करु न दिल्यामुळे ही घटना घडली.

रूग्णाच्या नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण
author img

By

Published : Aug 1, 2019, 11:18 PM IST

ठाणे - स्व. काशिनाथ पाटील रूग्णालयामध्ये रुग्णाने नातेवाईकांच्या मदतीने डॉक्टर दाम्पत्य, कंपाउंडर, परिचारिका, मॅनेजर, मेडिकल चालक आदींना शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. तसेच त्यांनी रुग्णालयाची तोडफोडही केली आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून याबाबत नारपोली पोलिसांनी मारहाण करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. रुग्णाच्या नातेवाईकांना (आयसीयू) अतिदक्षता विभागात प्रवेश करु न दिल्यामुळे ही घटना घडली.

रूग्णाच्या नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण

याबाबत अधिक माहिती अशी की, मुस्तफा शेख याच्या छातीवर ब्लेडने वार झाल्यामुळे त्याला भिवंडीतील स्व. काशिनाथ पाटील रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. या घटनेबाबत नारपोली पोलीस ठाण्यात डॉ. शाहीद खान यांनी माहिती देऊन रुग्णावर उपचार सुरू केले होते. यावेळी रुग्णाची पत्नी आस्मा शेख व त्याचे नातेवाईक सतत आयसीयूमध्ये ये-जा करत होते. त्यामुळे खान यांनी तुमच्यामुळे रूग्णाला त्रास होत आहे. तुम्ही आयसीयूमधून बाहेर जा, असे सांगतिले. तेव्हा रूग्णाच्या नातेवाईकाने अतिदक्षाता विभागातच गोंधळ घातला. तसेच मशीनची व बाहेरील अन्य सामानासह फर्निचरची तोडफोड करत डॉ. शाहीद खान व त्यांची पत्नी डॉ.स्वाती खान, मॅनेजर कैलास म्हात्रे, डॉ. दिनेश पाटील तसेच मेडिकल चालक तय्यब शेख व परिचारिकेला मारहाण केली.

त्यानंतर रुग्ण व त्याच्या नातेवाईकांनी रूग्णालयाचे बिल न देताच पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या मागे रूग्णालयातील कर्मचारी विठोबा पाटील गेले असता त्यांनादेखील जबर मारहाण करण्यात आली. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुस्तफा व त्याची पत्नी आसमा या दोघांना ताब्यात घेतले आहे. तर त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे.

Intro:किट नंबर 319

Body:आयसीयूमधून बाहेर काढल्याच्या वादातून डॉक्टरांना मारहाण करीत हॉस्पिटलची तोडफोड; घटना सीसीटीव्हीत कैद

ठाणे : रुग्णाच्या नातेवाईकांना (आयसीयू) अतिदक्षता विभागात जाऊ नका असे रुग्णालयात प्रशासनाने सांगितले असता, त्या वादातून रुग्णाने नातेवाईकाच्या साथीने डॉक्टर पती - पत्नीसह कंपाउंडर ,परिचारिका, मॅनेजर , मेडिकल चालक आदींना शिवीगाळ करीत या सर्वांना मारहाण केली, तसेच रुग्णालयाची तोडफोड केल्याची घटना घडली आहे, या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून नारपोली पोलिसांनी सीसीटीव्ही च्या आधारे राडेबाजापौकी दोघांना अटक केली आहे,
मुस्तफा शेख याच्या छातीवर ब्लेडने वार झाल्याने त्याला भिवंडीतील स्व. काशिनाथ पाटील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, या घटनेबाबत नारपोली पोलीस ठाण्यात हॉस्पिटलचे डॉक्टर शाहीद खान यांनी माहिती देऊन रुग्णावर उपचार सुरू केले होते , यावेळी रुग्णाची पत्नी आस्मा शेख व त्याचे नातेवाईक सतत आयसीयूमध्ये ये-जा करीत होते त्यामुळे डॉक्टर शाहीद खान यांनी तुमच्या सततच्या येण्याजाण्याचा त्रास इतर रुग्णाला होऊ शकतो यासाठी तुम्ही आयसीयूमधून बाहेर जा असे सांगताच रुग्णांच्या नातेवाईकांचा पारा चढून आयसीयू मध्येच गोंधळ घातला व आयसीयू मधील एका मशीनची व बाहेरील अन्य सामानासह फर्निचरची तोडफोड करीत डॉक्टर शाहीद खान व त्यांची पत्नी डॉक्टर स्वाती खान , मॅनेजर कैलास म्हात्रे, डॉक्टर दिनेश पाटील तसेच मेडिकल चालक तय्यब शेख व परिचारिका यांना मारहाण केली, त्यानंतर राडेबाज रुग्ण व त्याच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलचे बिल न देताच पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांच्या मागे हॉस्पिटल मधील कर्मचारी विठोबा पाटील गेले असता त्यांनादेखील जबर मारहाण करण्यात आली या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून डॉक्टर शाहीद खान यांनी नारपोली पोलिस ठाण्यात रुग्ण मुस्तफा शेख व त्याची पत्नी आस्मा शेख व राडेबाज नातेवाईका विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी मुस्तफा व त्याची पत्नी आसमा या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे तर त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरू केला आहे.
ftp fid ( 1, cctv, )
mh_tha_5_hospital_rada_1_cctv_mh_10007

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.