ETV Bharat / state

एक 'नकोशी' नाल्यात, तर दुसरीला फेकले रेल्वे रुळावर - उल्हासनगर नवजात अर्भक

ठाण्यातील उल्हासनगरमध्ये माणुसकीला काळीमा फासणार घटना घडली आहे. आज २२ जानेवारीला स्त्री जातीचे दोन नवजात अर्भक मृतावस्थेत आढळल्याने खळबळ निर्माण झाली आहे.

neonatal babies ulhasnagar thane
एक 'नकोशी' नाल्यात, तर दुसरीला रेल्वे रुळावरील दगडावर फेकले
author img

By

Published : Jan 22, 2020, 8:52 PM IST

ठाणे - मुलींना वाचण्यासाठी देशभरात मोहीम सुरू आहे. मात्र, मुली नकोशी होत चालल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यातच उल्हासनगरमध्ये स्त्री जातीचे दोन अर्भक मृतावस्थेत आढळून आले आहे. त्यापैकी एक अर्भक नाल्यात फेकले होते, तर दुसरे अर्भक उल्हासनगर ते विठ्ठलवाडी दरम्यान रेल्वे रुळावर फेकून दिले होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

एक 'नकोशी' नाल्यात, तर दुसरीला रेल्वे रुळावरील दगडावर फेकले

रेल्वे रुळावरील दगडावर फेकल्याने मृत्यू -
उल्हासनगर ते विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकादरम्यान दोन्ही रेल्वे ट्रॅकच्यामध्ये काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीत नवजात स्त्री जातीचे अर्भक बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्थानकातील ड्युटीवर असणारे पोलीस हवालदार अशोक माने यांना दिसले. त्यांनी त्वरीत महिला पोलीस कॉन्स्टेबल कल्पना साळवी यांच्या मदतीने त्या नवजात अर्भकाला उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याला तपासून ते मृत झाल्याचे घोषित केले. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्या अर्भकाला धावत्या रेल्वे गाडीतून फेकून किंवा रेल्वे रुळावर टाकून पसार झाले असावे, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे ते अर्भक नुकतेच जन्माला आलेले दिसत होते. त्याला रेल्वे रुळावरील दगडावर फेकल्यामुळे त्याच्या डोक्याला मार लागला होता. तसेच शरीरावर जखमा आणि उजवा पाय तुटलेल्या अवस्थेत होता. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

...तर दुसरी नकोशी नाल्यात -
वरील घटना ताजी असतानाच उल्हासनगरातील कॅम्प नंबर २ येथील गोल मैदानाजवळील गेट अनुप अपार्टमेंटच्यामागील नाल्यात दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. हे अर्भक दोन ते चार दिवसांपूर्वी जन्मलेले होते. याबाबत उल्हासनगर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी गटारीतून त्या अर्भकाचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर रुग्णालयात नेण्यात आले. कोणीतरी बाळाचा जन्म लपवण्यासाठी त्याची गुप्तपणे विल्हेवाट लावली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तडाखे करीत आहेत.

Intro:kit 319Body: एक नाल्यात तर दुसरी ‘नकोशी’ रेल्वे रुळावर मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ

ठाणे : बेटी बचाव, देश बचाव असा नारा देशभरात दिला जात आहे. मात्र त्यातच मुली नकोशा होत चाललेल्या घटना वारंवार घडत असताना उल्हासनगरात मृत अवस्थेत दोन स्त्री अर्भक मृत अवस्थेत मिळून आल्याचे उघडकीस आले आहे. त्यातील एक अर्भक नाल्यात फेकलेल्या अवस्थेत तर दुसरे अर्भक उल्हासनगर ते विठ्ठलवाडी दरम्यान रेल्वे रूळावर फेकून दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
उल्हासनगर ते विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान दोन्ही रेल्वे ट्रॅकच्या मध्ये काळया रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीत नवजात स्त्री जातीचे अर्भक फेकलेल्या अवस्थेत बुधवरी सकाळी पाहुणे ८ च्या सुमारास रेल्वे स्थानकातील डयुटीवर असणारे पो.हवा.अशोक माने यांना दिसले. त्यांनी त्वरीत महिला पो.कॉ. कल्पना साळवी यांच्या मदतीने त्या नवजात अर्भकाला उल्हासनगरातील मध्यवर्ती रूग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याला तपासून ते मृत झाल्याचे घोषित केले. कोणीतरी अज्ञात स्त्री किंवा पुरूष याने त्या नवजात स्त्री जातीच्या अर्भकाला धावत्या रेल्वे गाडीतून फेकून किंवा रेल्वे रुळावर आणून त्या ठिकाणी टाकून ते पसार झाले असावे असा अंदाज पोलिसांनी वर्र्तवला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे ते अर्भक नुकताच जन्माला आलेले दिसत होते. त्याला रेल्वे रुळावरील दगडावर फेकण्यात आल्यामुळे त्याच्या डोक्याला मार लागलेला व शरीरावर जखामा झालेल्या व उजवा पाय तुटलेल्या अवस्थेत होता. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ताजी असताना उल्हासनगरातील कॅम्प नं. २ येथील गोल मैदान,गेट अनुप अपार्टमेंटच्या मागे नाल्यात दुपारी १२ वाजता स्त्री जातीचे दोन ते चार दिवसापूर्वी जन्माला आलेल्या अर्भकाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या गटारीतून त्या अर्भकाचा मृतदेह बाहेर काढून त्याला मध्यवर्ती रूग्णालयात नेले. कोणीतरी अपत्य जन्माची लपवणुक करण्याकरीता गुप्तपणे विल्हेवाट लावून त्याचा मृतदेह नाल्यात फेकल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरूध्द उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास स.पो.नि.तडाखे करीत आहेत.

Conclusion:nakoshi
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.