ठाणे : बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणीं संध्याकाळी ६.३० च्या सुमारास मातीचा ढिगारा अचानक खाली आला. त्यामध्ये या कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामध्ये हबीब बाबू शेख (४२) आणि रणजित कुमार सैनी (३५) अशी मृतांची नावे असून, निर्मल रामलाल राब (४९) रा. शिवाजीनगर, (मुंब्रा) याच्या गळ्याला दुखापत झाली आहे. ही इमारत सुयोग मालुसरे यांची यश इन्फ्रा या विकासक कंपनीतर्फे उभारण्यात येत असून, बांधकामाच्या ठिकाणी मजुरांच्या सुक्षिततेकडे दुर्लक्ष केल्यानेच ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे.
घटनेची माहिती मिळताचा अग्निशमन कर्मचारी दाखल : यामध्ये अनेक कामगार काम करत असताना ३ कामगार यामध्ये अडकल्याची माहिती मिळताच नौपाडा पोलीस, ठाणे मनपा आपत्कालीन पथक,ठामपा अग्निशमन दलाने धाव घेऊन जेसीबीच्या साह्याने ढिगार्याखाली गाडलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, एकाच मजुराचे प्राण वाचवण्यात पथकांना यश आले. तर पुन्हा एकदा कामगारांच्या सुरक्षितेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महापालिकेच्या अहवालानंतर कारवाई : ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून जो अहवाल येईल त्यानुसारच पुढील कारवाई केली जाईल असे सांगितले आहे सद्यस्थितीला अकस्मात मृत्यूची नोंद नौपाडा पोलिसांनी केली असून यामध्ये ठेकेदार बांधकाम व्यावसायिक आणि आणखी कोणाचा हलगर्जीपणा आहे का याचा अहवाल आल्यावरच योग्य ती पुढील कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे याआधी देखील अनेकदा अशा प्रकारे अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे मात्र महापालिकेकडून योग्य ती माहिती मिळत नसल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पिढी त्यांच्या कुटुंबीयांना आजही न्यायासाठी न्यायालयाचे हेलपाटे घालावे लागत असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.
टाकी साफ करताना झाला होता अनेकांचा मृत्यू : काही महिन्यांपूर्वी याच नौपाडा परिसरामध्ये पाण्याची टाकी आणि शिवरेची टाकी साफ करीत असताना दोघांचा बळी गेला होता, तर तिघे अत्यवस्थ झाले होते. या संदर्भातदेखील महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून योग्य तो अहवाल न आल्यामुळे त्या जखमींना आणि मृत्युमुखी पडलेल्या पीडिताच्या कुटुंबीयांना आजही न्यायाची प्रतीक्षा आहे आणि म्हणूनच महानगरपालिकेचा अग्निशामनदालाचा येणारा अहवाल हा या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाचा ठरतो मात्र हा अहवाल राजकीय दबावापोटी वेळेत येत नाही आणि त्यामुळे पोलीस कारवाई करत नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे. वा