नवी मुंबई - शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सद्यस्थितीत नवी मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाच हजारांच्यावर गेली आहे. आज 236 नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह वाढले आहेत. 102 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. कोरोनामुळे आज नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईमध्ये गेल्या 15 दिवसात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हे वाढलेले रुग्ण प्रशासनाच्या चिंतेत भर टाकत आहेत. आत्तापर्यंत नवी मुंबईत 5 हजार 640 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून पैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. शहरातील 18 हजार 540 लोकांची कोविड 19 ची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 12 हजार17 जण निगेटिव्ह आले असून, 894 जणांचे तपासणी अहवाल येणे प्रलंबित आहे.
सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 5 हजार 629 इतकी आहे. आज आढळलेल्या 236 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये तुर्भेमधील 8, बेलापूरमधील 45, कोपरखैरणेमधील 31, नेरुळमधील 37, वाशीतील 14, घणसोलीमधील 37, ऐरोलीमधील 49, दिघ्यातील 15, असे एकूण 236 नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये 87 स्त्रिया व 149 पुरुषांचा समावेश आहे.
शहरात 5 हजार 629 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 3 हजार 188 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. आज 102 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. यामध्ये बेलापूरमधील 8, नेरूळमधील 24, वाशीमधील 10, तुर्भेमधील 25, कोपरखैरणेमधील 11, घणसोलीमधील 13, ऐरोलीमधील 10, दिघा 1, अशा एकूण 102 व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये 52 स्त्रिया आणि 50 पुरुषांचा समावेश आहे. शहरात सद्यस्थितीमध्ये 2 हजार 252 व्यक्तींवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 189 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आज 9 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.