ETV Bharat / state

पूर्ववैमनस्यातून मित्राची निर्घृण हत्या; दोन मित्र गजाआड - ashish parera

पूर्वी झालेल्या क्षुल्लक भांडणाचा राग मानत धरून दोन मित्रांनी मिळून दारू पिण्याच्या बहाण्याने बोलवून मित्राची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  ही घटना उल्हासनगर मधील कॅम्प नंबर 4 येथील कॅनरा बँकेच्या पाठीमागे घडली. दिनेश साधुराम शर्मा (वय 30) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, आशिष परेरा आणि सागर ठाकूर अशी आरोपिंची नावे आहेत.

पूर्ववैमनस्यातून मित्राची निर्घृण हत्या
author img

By

Published : Aug 25, 2019, 11:43 PM IST

ठाणे - पूर्वी झालेल्या क्षुल्लक भांडणाचा राग मानत धरून दोन मित्रांनी मिळून दारू पिण्याच्या बहाण्याने बोलवून मित्राची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उल्हासनगर मधील कॅम्प नंबर 4 येथील कॅनरा बँकेच्या पाठीमागे घडली. दिनेश साधुराम शर्मा (वय 30) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, आशिष परेरा आणि सागर ठाकूर अशी आरोपींची नावे आहेत.

murder
पूर्ववैमनस्यातून मित्राची निर्घृण हत्या

विठ्ठलवाडी पोलिसांनी आरोपी आशिष परेरा याच्यावर हिल लाईन पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केलेली आहे. असे असतानाही हद्दपारीचे उल्लंघन करून तो पुन्हा उल्हासनगर शहरात मित्रांना भेटण्यासाठी आला होता. तेव्हाच त्याने आपला मित्र दिनेश याची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

पूर्ववैमनस्यातून मित्राची निर्घृण हत्या

मिळालेल्या माहितीनुसार दिनेशला रात्री 11 वाजल्याच्या सुमारास आशिषने मोबाईल वर संपर्क करून बियरची बाटली घेऊन कॅम्प नंबर 4 परिसरातील कॅनरा बँकेच्या पाठीमागे बोलावले. मृतक दिनेश हा त्या ठिकाणी गेला असता, तेथे आशिष आणि सागर हे उपस्थित होते. त्यावेळी त्यांच्यात पूर्वी झालेल्या भांडणावरून शुल्लक वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन आरोपी आशिषने लोखंडी पत्रा दिनेशच्या डोक्यात मारला. तर, आरोपी सागरने लाकडी दांडक्याने त्याच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. हे दोन्ही घाव वर्मी लागल्याने दिनेश रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला. हे पाहून दोघाही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

घटनेची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी अवस्थेत पडलेल्या दिनेशला उपचारासाठी मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी मनोज शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आशिष व सागर यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी भिवंडीमधील एका लॉज मधून ताब्यात घेतले आहे. दरम्यान, अटकेत असलेल्या दोन्ही मित्रांनी दिनेशच्या हत्येची कबुली दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भोमे यांनी दिली आहे. तर, घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माने करत आहेत.

Intro:किट नंबर 319

Body:पूर्ववैमनस्यातून मित्राची निर्घृण हत्या ; दोन मित्र गजाआड

ठाणे : पूर्वी झालेल्या क्षुल्लक भांडणाचा राग मानत धरून दोन मित्रांनी मिळून दारू पिण्याच्या बहाण्याने बोलवून त्या मित्राची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे, ही घटना उल्हासनगर मधील कॅम्प नंबर 4 येथील कॅनरा बँकेच्या पाठीमागे घडली आहे.
दिनेश साधुराम शर्मा (वय 30 रा. 5 नंबर , प्रेम टेकडी ) असे निर्घृणपणे हत्या केलेल्या मित्राचे नाव आहे, तर विठ्ठलवाडी पोलिसांनी हत्येप्रकरणी आशिष करीरा आणि सागर ठाकूर असे गजाआड केलेल्या मित्रांची नावे आहेत,
खळबळजनक बाब म्हणजे आरोपी आशिष करीरा याच्यावर हिल लाईन पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे, असे असताना त्याने हद्दपारीचे उल्लंघन करून तो पुन्हा उल्हासनगर शहरात मित्रांना भेटण्यासाठी आला होता. त्यातच त्याने आपला मित्र दिनेश याची निर्घृण पणे हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मृतक दिनेश याचा जीन्सचा कारखाना असून शनिवारी कारखान्यात सुट्टी असल्याने दिनेश घरीच होता. त्यावेळी रात्री 11 वाजल्याच्या सुमारास त्याचा मित्र आशिष याने मोबाईल वर संपर्क करून बियरची बाटली घेऊन कॅम्प नंबर 4 परिसरातील कॅनरा बँकेच्या पाठीमागे बोलावले. मृतक दिनेश हा त्या ठिकाणी गेला असता तेथे आशिष व सागर हे 2 मित्र उभे होते. त्यावेळी त्यांच्यात पूर्वी झालेल्या भांडणावरून शुल्लक वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन आरोपी आशिष ने लोखंडी पत्रा दिनेश च्या डोक्यात मारला, तर आरोपी सागर याने लाकडी दांडक्याने त्याच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. हे दोन्ही घाव वर्मी लागल्याने दिनेश रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला. हे पाहून दोघेही आरोपींनी घटनास्थळा वरून पळ काढला. त्यानंतर कोणीतरी व्यक्तीने या घटनेची माहिती विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात दिल्या नंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या दिनेशला उपचारासाठी मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र येथिल डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
या घटनेप्रकरणी मनोज शर्मा यांनी दिलेल्या फिर्यादी वरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा आशिष व सागर यांच्यावर दाखल करून तपास सुरू केला. हत्येनंतर फरार झालेले दोन्हीही आरोपी मित्र भिवंडीतील एका लॉज मध्ये लपून बसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांना मिळाली होती. त्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक राजपूत पोलीस नाईक राहुल काळे, चित्ते , रोहित बुधवंत, पोलीस हवालदार राख, व चव्हाण यांनी भिवंडी तील लॉज मधून ताब्यात घेऊन अटक केली.
दरम्यान, अटकेत असलेल्या दोन्ही मित्रांनी दिनेशच्या हत्येची कबुली दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भोमे यांनी दिली असुन अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माने करीत आहेत.

सर,
पोलीस बाईट, आरोपी आणि घटनास्थळचे व्हिजवल तसेच मृतक चा फोटॊ डेक्स व्हॉट्सपवर टाकले आहे, कृपया बतमीसाठी वापरणे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.