ETV Bharat / state

Thane Accident : ठाणे जिल्ह्यात अपघाताच्या दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू; तरुणीला टेम्पोने तर पोलिसाला ट्रकने उडविले - भिवंडी शहरातील अपघात

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात दोन वेगवेगळ्या वाहनांच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडल्या आहेत. या अपघात प्रकरणी शांतीनगर आणि नारपोली पोलीस ठाण्यात ट्रक चालकांवर गुन्हा दाखल करण्यात येऊन दोघांना अटक करण्यात आली आहे.

Thane Accident
अपघात
author img

By

Published : Mar 30, 2023, 8:03 PM IST

ठाणे : पहिल्या घटनेत काल्हेर येथील शिल्पा चौकात सुरभी संजय वाघमारे (वय १७) या मुलीच्या अंगावर एका आयशर टेम्पो चालकाने भरधाव टेम्पो घातला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या अपघात दोन वाहतूक पोलीस एकाच दुचाकीवरून जात असताना त्यांची दुचाकी खड्यात आदळून दुचाकीवरील एक वाहतूक पोलीस जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. भाऊसाहेब उर्फ विशाल मारुती कुंभारकर (३३ रा.भादवड) असे मृतक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर सुजय शिवाजी नाईक (४२ रा.कल्याण ) असे जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

तरुणीचा मृत्यू: पहिल्या घटनेत भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील शिल्पा चौकात एका आयशर टेम्पो चालकाने टेम्पो भरधाव वेगात चालवून सुरभी संजय वाघमारे या १७ वर्षीय मुलीला जोरात धडक दिली. अपघातात तिचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून टेम्पो चालक निवृत्ती गंगाराम शिंदे या ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहतूक पोलिसाचा अपघाती मृत्यू: दुसऱ्या घटनेत रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक पोलिसांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. यापैकी भाऊसाहेब उर्फ विशाल मारुती कुंभारकर हे खड्‌ड्यामुळे खाली पडल्यांनंतर मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना चिरडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुचाकीच्या पाठीमागे बसलेला दुसरा कर्मचारी सुजय शिवाजी नाईक हा गंभीर जखमी झाला आहे. हे दोघेही भिवंडीतील नारपोली वाहतूक शाखेत कार्यरत होते. घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विशालचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. जखमी अवस्थेत पोलीस हवालदार नाईक याला खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे. या अपघात प्रकरणी मृतकचा भाऊ नितीन मारुती कुंभारकर याच्या फिर्यादीवरून शांतीनगर पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा: Udayanraje Bhosale Met Amit Shah : खासदार उदयनराजेंनी घेतली अमित शाह यांची भेट; 'हे' आहे कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.