ठाणे - जिल्ह्यातील दिवा परिसरातील अनाधिकृत चाळी उभारल्याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी दोघांना ताब्यात घेतले. जय शंकर सिंग आणि चौबे अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.
दिवा परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळी आहे. या चाळी जागा बळकावून बांधण्यात आल्या असून तिवरांच्या झाडांची कत्तल करून या चाळींचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाने या चाळींवर जिल्हा प्रशासन आणि पालिकांची संयुक्त कारवाई २ दिवसांपासून सुरू आहे. या ठिकाणी अनाधिकृत चाळ उभारल्याप्रकरणी मंगळवारी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर कारवाई करत मुंब्रा पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी जय शंकर सिंग आणि चौबे यांना ताब्यात घेतले.
२ दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर प्रचंड पोलीस बंदोबस्तात दिवा येथील कांदळ वनांवर उभ्या असलेल्या बांधकामांवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने तोडक कारवाई करण्यात आली. जवळपास ३ हजार नागरिकांचा विरोध डावलून ही कारवाई करण्यात आली. यात बुधवारी कांदळ वनावर उभी असलेली ३८५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली होती.
हेही वाचा - ठाण्यात हेडफोन लावून रेल्वे रूळ ओलांडताना तरुणीचा मृत्यू
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळींचे साम्राज्य असून या ठिकाणी जागा बळकावून चाळी बांधण्यात आल्या आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी सकाळपासून तहसीलदारांनी या चाळीवर कारवाई करण्यास सुरुवात केली. अनधिकृत चाळीवर जेसीबी फिरवण्यात आला. यावेळी, डोक्यावरचे छत गेल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी या कारवाईला विरोध केला होता.
हेही वाचा - मुंबई-नाशिक महामार्गावर एसटी बसची कंटेनरला धडक; ४ प्रवासी जखमी