ठाणे: मिळालेल्या माहितीनुसार, कल्पना (काल्पनिक नाव) ही महिला उल्हासनगरमध्ये राहत असून तिला १५ वर्षांची मुलगी आहे. या अल्पवयीन मुलीने दोन वर्षांपूर्वी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंडवर स्वतःचे फोटो अपलोड केले होते. आरोपी पियूष कृपलानी याने त्या मुलीच्या इंस्टाग्राम अकाऊंडवरून तिचे फोटो कॉपी केले. यानंतर त्याला एडिट करून त्याचे अश्लील फोटोत रूपांतर केले. आरोपीने ते फोटो आपल्या मोबाइलच्या गॅलरीत सेव्ह करून ठेवले होते.
समाजसेवकामुळे फुटले बिंग: आरोपी पियूष हा काही दिवसांपूर्वी जुगारात पैसे हरला होता; मात्र त्याच्याकडे पैसे नसल्याने जुगार अड्ड्याच्या मालकाने त्याच्याकडील मोबाइल हिसकावून घेतला. त्यानंतर मोबाईल परत मिळवण्यासाठी पियूषने त्याचा मित्र वरुण रोहराला गाठले. त्याच्याकडून 16 हजार रुपये उधार घेऊन मोबाईल सोडवून आणला. गेल्याच आठवड्यात आरोपी वरुण रोहरा हा जुगारी पियूषच्या मोबाइल गॅलरीमधील फोटो, व्हिडिओ बघत होता. यावेळी त्याला मोबाईल गॅलरीत अनेक मुलींचे अश्लील फोटो आढळले. वरुणने याची माहिती त्याच्या ओळखीचा समाजसेवक नवीन डिगवानी यांना दिली. त्यानंतर समाजसेवकाने मोबाईल मधील अनेक मुलींचे फोटो तपासले. त्यामध्ये एक १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ओळखीची निघाली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईला अश्लील फोटोबद्दल माहिती दिली गेली.
आईची पोलिसात धाव: पीडित मुलीच्या आईने तो घृणास्पद फोटो पाहताच ती थक्कच झाली. तिने उल्हासनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन घटनेची माहिती गुन्हे शाखेचे पीआय चंद्रहार गोडसे यांना दिली. त्यानंतर अश्लील फोटो पाहून पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांनी दोन्ही विकृत आरोपीं विरुद्ध भादंवि कलम 354, 67(ब) आय.टी. एक्ट नुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या आधारे विकृत पियूष कृपलानी आणि वरुण रोहरा या दोघांना गुरुवारी अटक करण्यात आली. एकीकडे उल्हासनगर शहरात मुलींना ब्लॅकमेलिंग करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या दरम्यान विकृतांचे घृणास्पद कृत्य समोर आल्याने पालक वर्गात संतापची लाट पसरली आहे.
हेही वाचा:
- Karnataka Gov Formation : कोणाची लागणार मंत्रिमंडळात वर्णी; सिद्धरामय्या, डीके शिवकुमार आज दिल्लीत घेणार पक्षश्रेष्ठींची भेट
- Cannes-2023 : मृणाल ठाकूरने रेड कार्पेटवर केले सौदर्यांचे प्रदर्शन
- Satish Kaushik: अभिनेता सतीश कौशिक यांचा खून झाला असा आरोप करणाऱ्या सानवी मालू आणि राजेंद्र चबर यांना न्यायालयाचे समन्स जारी