ठाणे Tur Dal Price Hike : तूरडाळसह इतर डाळींचे भाव हळूहळू गगनाला भिडत असून साधे वरणभात खाणे देखील कठीण झाले आहे. अवकाळी पाऊस झाल्याने तूरडाळीचे उत्पादन २५ टक्के घटल्याने येणाऱ्या काळात भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच आता कांदा आणि टोमॅटोचे भाव शंभरीकडे वाटचाल करत असल्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे.
तूरडाळींच्या उत्पादनात 25 टक्के तूट : भारतात सर्वसामान्यांचे अन्न म्हणजे वरण-भात, परंतु आता हाच वरण भात देखील सर्व सामान्यच्या ताटातून बाहेर जातो का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वरणासाठी वापरण्यात येणारी तूरडाळीचे पीक केवळ खरीप हंगामात घेण्यात येते. परंतु अनियमित पावसामुळे तूरडाळींच्या उत्पादनात येत्या काही काळात २५ टक्क्यांपर्यंत तूट जाण्याची शक्यता आहे. सध्या डाळीची किंमत दोनशे रुपये किलोच्या घरात आहे. तर तूरडाळ आणखी मागण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आता सर्वसामान्यांचा कल हा मूग डाळीकडे वळतो, परंतु मूग डाळीचे भाव देखील हळूहळू वाढू लागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. मूग डाळीचे उत्पादनात २० टक्क्यांची तूट अपेक्षित असताना ही तूट जवळपास ४० टक्क्यांपर्यंत जाईल अशी शक्यता निर्माण झाल्याने, सरकार समोर मोठे संकट उभे राहिले आहे. यंदा तूरडाळीचे उत्पादन ४५.०५ लाख टनाचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र ३३.१२ लक्ष टनच उत्पादन येईल, असे चित्र दिसत असल्याने डाळींचे भाव आणखी वाढतील यात शंकाच नाही.
भाजीपाल्याचे दर कडाडले : केंद्र सरकारने यंदाच्या खरीप हंगामात २०.२० लाख टन एवढे मुगडाळीचे उत्पादन होईल असा अंदाज वर्तवला आहे. हे उत्पादन केवळ १४.०५ लाख टन एवढेच येणार असल्याचं स्पष्ट होत आहे. मूग डाळीचे भाव देखील वाढणार असल्याने ही डाळ देखील सर्वसामान्यांच्या जेवणातून गायब होईल अशी भीती व्यक्त होत आहे. एकीकडे डाळीचे भाव वाढत असताना दुसरीकडे कांदा आणि टोमॅटो हे भारतीय जेवणातील अविभाज्य घटक सुद्धा सामान्यांच्या आवाक्या बाहेर जाताना दिसत आहेत. कांद्याचे भाव किरकोळ बाजारात 80 रुपये प्रति किलो तर टोमॅटोचे भाव साठ रुपयांच्यावर गेल्याने काय खायचे हा मोठा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. सर्व प्रकारच्या भाज्या आणि फळांचे भाव अशाच प्रकारे वाढत राहिले तर गृहिणींच्या स्वयंपाक घराचे बजेट कोलमडेल या शंका नाही.
सरकारने आताच करावे नियोजन : तूरडाळ आणि एकूणच सर्व डाळिंबवर झालेला उत्पन्न घटनेच्या प्रकारामुळे केंद्र सरकारने आतापासूनच या बाबतीत नियोजन करणे आवश्यक आहे. पुढील वर्षी देखील येणारे कमी उत्पन्न लक्षात घेऊन त्यासाठी त्वरित उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं देविदास सावंत यांनी सांगितलं. महाराष्ट्रात डाळिंबाचे उत्पादन जिथे होते त्या मराठवाड्यात देखील पीक कमी आले आहे. पुढील वर्षी येणाऱ्या पिकावर देखील अवकाळी पावसाचा परिणाम झालाय.
हेही वाचा -