ETV Bharat / state

संतापजनक! आदिवासी विवाहितेची सामूहिक बलात्कार करून हत्या

author img

By

Published : Sep 16, 2019, 10:35 PM IST

आदिवासी विवाहितेची सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भिवंडी तालुक्यातील महाळुंगे (गोठणपाडा ) येथील निर्जनस्थळी ही घटना घडली आहे.

धक्कादायक! आदिवासी विवाहितेची सामूहीक बलात्कार करून हत्या

ठाणे - आदिवासी विवाहितेची सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भिवंडी तालुक्यातील महाळुंगे येथील निर्जनस्थळी ही घटना घडली आहे. याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात बलात्कारासह हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदिवासी विवाहित महिला इतर महिलांसोबत कामावर जात होती. ही महिला रविवारी सायंकाळी एसटी बसने महाळुंगे बस स्टॉपवरील दुकानातून सामान खरेदी करून घराच्या दिशेने निघाली होती. ती एकटीच रस्त्याने जात असताना तिला दोघांनी उचलून निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. तिच्याच साडीच्या पदराने गळा आवळून हत्या केली. रात्री उशिरापर्यंत आपली पत्नी घरी परतली नाही म्हणून पतीने तिची चौकशी वहिनीकडे केली. त्यावेळी ती अन्य महिलांच्या पुढे घरी निघाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तिचा शोध घेण्यासाठी पती महाळुंगे नाक्याकडे गेला. त्यावेळी दुकानदाराने मृत महिला साडेसात वाजण्याच्या सुमारास दुकानातून सामान घेऊन निघाल्याचे सांगितले. त्यावेळी भयभीत झालेल्या पतीने पत्नीचा शोध घेतला असता बंधाऱ्याच्या अलीकडच्या रस्त्याच्या कडेला त्याला छत्री व हातरुमाल पडल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याने अधिक पुढे जाऊन पाहिले असता पत्नीच्या अंगावरील कपडे फाटलेल्या अवस्थेत ती निपचित पडल्याचे निदर्शनास आले. पतीने तत्काळ याची माहिती पाड्यातील नागरिकांना दिली.

हे ही वाचा - गुंगीचे औषध देवून अल्पवयीन मुलीवर 3 वर्षे वारंवार बलात्कार; आरोपींमध्ये पीडितेच्या आईचाही समावेश

या संदर्भात गणेशपुरी पोलिसांना माहिती मिळताच अंबाडी पोलीस उपअधिक्षक दिलीप गोडबोले, पोलीस ठाण्याचे महेश सगडे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या घटनेचे पडसाद परिसरात उमटताच श्रमजीवी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस बाळाराम भोईर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष संगिता भोमटे, जया पारधी आदींच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी गणेशपुरी पोलीस ठाण्यात एकच गर्दी करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी लावून धरली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गणेशपुरी पोलिसांनी नितीन नारायण भोसले व त्याच्या साथीदाराला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी गणेशपुरी पोलिसांनी कलम ३०२ व ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक महेश सगडे करीत आहे.

हे ही वाचा - पत्नीचा खून करून फरार आरोपीला ठाणे पोलिसांनी तब्बल १३ वर्षांनंतर केली अटक

दरम्यान, या अमानुष घटनेतील दोषींवर जलदगती न्यायालयात खटला चालवून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या महिला आघाडीच्यावतीने १८ सप्टेंबरला तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून निषेध करण्यात येणार आहे, अशी माहिती बाळाराम भोईर यांनी दिली आहे.

हे ही वाचा - थरारक.. मित्रानेच केली मैत्रिणीची गळाचिरुन हत्या

Intro:kit 319Body:धक्कादायक ! आदिवासी विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून हत्या : संशयित २ नराधम ताब्यात

ठाणे :- २९ वर्षीय आदिवासी विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हि घटना भिवंडी तालुक्यातील महाळुंगे (गोठणपाडा ) नजीकच्या निर्जनस्थळी घडली आहे. याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात नराधमांवर बलात्कारा सह हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरु केला आहे.

पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाळुंगे (गोठणपाडा ) येथील महिला प्रिती दिलीप भावर हि आदिवासी विवाहिता अन्य महिलांसोबत वालीव ,ता.वसई येथे कामावर जात होती. ती काल सायंकाळी एसटी बसने महाळुंगे बस स्टॉपवर उतरून दुकानातून घरगुती सामान खरेदी करून घराच्या दिशेने निघाली होती. मात्र राहत्या घरी जाण्यासाठी झाडाझुडपातून जावे लागत असल्याने ती एकटीच रस्त्याने जात असताना अचानक तिची गाठ नराधमांसोबत पडली असता तिला दोघा नराधमांनी उचलून निर्जनस्थळी झाडाझुडपात नेवून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची साडीच्या पदराने गळा आवळून हत्या केली. रात्री उशिरापर्यंत प्रिती घरी परतली नाही. त्यावेळी पती दिलीप याने तिची चौकशी वहिनीकडे केली.त्यावेळी ती अन्य महिलांच्या पुढे घरी निघाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तिचा शोध घेण्यासाठी दिलीप महाळुंगे नाक्याकडे निघाला व त्याने पत्नी प्रिती हीच्याबाबत चौकशी केली. त्यावेळी दुकानदाराने प्रिती साडेसात वाजेच्या सुमारास दुकानातून सामान घेऊन निघाल्याचे सांगितले. त्यावेळी भयभीत झालेल्या दिलीप याने रस्त्याने पायपीट करीत पत्नी प्रिती हिचा शोध घेतला असता बंधाऱ्याच्या अलीकडच्या रस्त्याच्या कडेला प्रितीची छत्री व हातरुमाल पडल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याने अधिक पुढे जाऊन पाहिले असता पत्नीच्या अंगावरील कपडे फाटलेल्या अवस्थेत ती निपचित पडल्याचे निदर्शनास आले. पत्नीची अवस्था पाहून त्याने हंबरडाच फोडला व तात्काळ याची माहिती पाड्यातील नागरिकांना दिली.

या घटनेबाबत तात्काळ गणेशपुरी पोलीस ठाण्यात कळवण्यात येताच अंबाडी पोलीस उपअधिक्षक दिलीप गोडबोले ,पोलीस ठाण्याचे इंचार्ज महेश सगडे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. या संतप्त घटनेचे पडसाद परिसरात उमटताच श्रमजीवी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस बाळाराम भोईर ,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष संगिता भोमटे ,जया पारधी आदींच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी गणेशपुरी पोलीस ठाण्यात एकच गर्दी करून खूनी व अत्याचाऱ्यांना तात्काळ अटक करा अशी मागणी लावून धरली. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गणेशपुरी पोलिसांनी नितीन नारायण भोसले व त्याच्या साथीदाराला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. या घटनेचा गणेशपुरी पोलिसांनी भादंवि. कलम३०२ व ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास एपीआय महेश सगडे करीत आहे.
दरम्यान, या अमानूष घटनेतील दोषींवर फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या महिला आघाडीच्यावतीने १८ सप्टेंबर रोजी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून निषेध करण्यात येणार आहे. अशी माहिती सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी दिली आहे.

Conclusion:bhiwandi rep in mardar
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.