ETV Bharat / state

कोरोना लसीकरणाला घाबरून आदिवासी बांधवांचा जंगलात पळ - Tribal peoples vaccination news

लसीकरणासाठी शहरातील नागरिक गावात येतील या भीतीने आदिवासी बांधव गावाबाहेरील जंगलात दिवसभर लपून बसत असल्याचे आरोग्य विभागाच्या पाहणीत आढळून आले.

Tribal peoples
आदिवासी नागरिक
author img

By

Published : May 14, 2021, 6:29 PM IST

Updated : May 14, 2021, 7:04 PM IST

ठाणे - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना लसीकरण हा एकमेव आधार यापासून बचाव करण्यासाठी समोर दिसत आहे. एकीकडे शहरात कोरोनाची लस उपलब्ध नसल्याने ओरड होत असतानाच शहरातील नागरिक ग्रामीण लसीकरण केंद्रावर गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे. अशातच लसीकरणासाठी गावात कोणी येईल या भीतीने आदिवासी बांधव गावाबाहेरील जंगलात दिवसभर लपून बसत असल्याचे आरोग्य विभागाच्या पाहणीत आढळून आले. ठाणे जिल्ह्यापासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर भिवंडी तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील हे वास्तव चित्र समोर आल्याने ग्रामीण आरोग्य विभागाने आता आदिवासी गावपाड्यांवर लसीकरणावर जनजागृतीला सुरुवात केली आहे.

लसीकरणाबाबत आदिवासींच्या मनात भीती

जिल्हा ग्रामीण आरोग्य पथक सभापतीसह गावपाड्यात

कोरोना लसीकरण करण्यासाठी ऑनलाईन पद्धती ग्रामीण भागात अशिक्षित जनतेला समजत नसल्याने ग्रामीण भागात ऑफलाईन लसीकरण व्हावे अशी मागणी वाढत आहे. त्यातच आदिवासी समाज आज ही कपोलकल्पित भीतीने या लसीकरणापासून दूर पळत असल्याची आकडेवारी समोर आल्यावर जिल्हा परिषद आरोग्य समिती सभापती कुंदन पाटील यांनी आदिवासी विकास क्षेत्र कार्यक्षेत्रात येणाऱ्या चिंबी पाडा प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मनीष रेंघे यांसोबत भेट देत तेथील लसीकरणाची माहिती करून घेत या परिसरातील खडकी बुद्रुक,आमराई ,कुंभारपाड ,चिंबीपाडा ,बालखडी , पिंपळशेत, म्हसकर पाडा या आदिवासी पाड्यांना भेटी देऊन तेथील बायबापड्यांसह जमिनीवर बैठक मारून त्यांच्यामध्ये जनजागृती करून त्यांची समजूत काढत आहेत.

हेही वाचा - गोव्यात मे महिन्यात ऑक्सिजन अभावी 454 जणांचा मृत्यू ; 24 तासांत 76 दगावले

लसीबाबत आदिवसी बांधवांच्या मनात भीतीचे वातारण

लसीकरणास लस उपलब्ध नसल्याने शहरी भागात नागरीकांची ओरड होत असून ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रावर त्यांची गर्दी ओसंडून वाढत आहे .परंतु आज ही ग्रामीण भागातील आदिवासी समाज आजही लसीकरणा पासून लांब पळत आहे. लसी करणासाठी कोणी नव्हेच तर अनेक पाड्या वस्त्यांवरील आदिवासी समाज बांधव सकाळी लसीकरणासाठी पकडून घेऊन जातील म्हणुन जंगलात पळून जातात ,ही लस घेतली की आपण मरणार ,आपल्याला इतर आजार जडतील ,लस द्यायला घेऊन जातील आणि इतर अवयव काढून घेतली या कपोलकल्पित भीतीने या अशिक्षित समाज बांधवांच्या मनात घर केले आहे. त्यामुळे ग्रामीण आदिवासी भागात आज ही लसीकरण अत्यल्प झाले असून त्यामध्ये आदिवासी समाजाचा टक्का नगण्य आहे .

ग्रामीण भागात ऑफलाईन लसीकरण सुरू

आपण शहरी भागात राहणारे लसीकरणासाठी धावपळ करीत असताना ग्रामीण भागातील आदिवासी समाज लसीकरणा पासून दूर पळत आहे .त्यासाठी शासन प्रशासन लोकप्रतिनिधी समाजसेवी संस्था सुशिक्षित समाज घटक या सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असून या समाजाला लसीकरण सुरक्षित व आपल्या आरोग्यसाठी आवश्यक असल्याचा विश्वास या समाजाला देणे गरजेचे असल्याचे सांगत ग्रामीण भागात लसीकरण ऑनलाईन नाव नोंदणी शक्य नसल्याने ऑफ लाईन लसीकरण सुरू केले असल्याची माहिती कुंदन पाटील यांनी दिली आहे.

गैरसमज दूर करण्यासाठी तारेवरची कसरत

आम्ही दिवसभर शेतात रानात काबाडकष्ट करत असून कोरोनाने आमच्या पाड्यात अध्यापही शिरकाव केला नाही. आम्हाला कोणता आजार नाही, मग आम्ही लस कशाला घ्यायची असा सवाल उपस्थित करीत ज्यांना गरज आहे. त्यांना लस द्या असा प्रतिप्रश्न जनजागृती करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रखमाबाई या महिलेने केला. एकूणच लसीकरण समाजाच्या शेवटच्या घटकपर्यंत घेऊन जाण्यासाठी या समाजातील लसी बाबत पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी शासन प्रशासन यांना अजून बरीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे एवढे नक्की.

हेही वाचा - ऑक्सिजनअभावी रूग्णांचा मृत्यू, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसह तिघांविरुद्ध पोलिसात मनुष्यवधाची तक्रार दाखल

Last Updated : May 14, 2021, 7:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.