मीरा भाईंदर (ठाणे) - वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे व समस्यांचे निराकरण करण्यासाठी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे शहर अभियंता व कार्यकारी अभियंत्यांच्या नियंत्रणाखाली एक स्वतंत्र वाहतूक विभाग सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे वाहतूकीच्या कोंडीपासून सर्वसामान्य नागरीकांची सुटका होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.

हेही वाचा - नंदुरबार : गॅस पाईपलाईनचा सर्व्हे करणार्या पथकाला मारहाण, वाहनांची तोडफोड
मीरा-भाईंदर शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहनांच्या संख्या झपाट्याने वाढल्यामुळे शहराची वाहतूक व्यवस्था विसकळीत झालेली आहे. शहरात ठिकठिकाणी गॅरेजेस, कार वॉशिंग सेंटर, सर्व्हिस सेंटर, वाहन शोरूम तसेच विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. व्यवसाय करणाऱ्यांकडून वार्षिक दहा हजार रुपये परवाना शुल्क तसेच दंडनीय कार्यवाही करण्याचा ठराव मार्च २०१८ मध्ये मंजूर झालेला होता. परंतु या ठरावाची अद्यापपर्यंत क्षेत्रीय प्रभाग अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सभागृह नेता प्रशांत दळवी यांनी आयुक्त डॉ. विजय राठोड यांच्याकडे केली आहे.
हेही वाचा - कार आणि टँकरच्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू; बीड जिल्ह्यातील गेवराईजवळील घटना