ETV Bharat / state

वाहतूक कोंडी व रस्त्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी बेवारस वाहनांवर जप्ती

author img

By

Published : Feb 26, 2020, 7:50 PM IST

कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या भंगार आणि बेवारस दुचाकी चारचाकी गाड्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.

Kalyan
बेवारस वाहनांवर जप्तीची कारवाई

ठाणे - वाहतूक कोंडी व शहरातील रस्त्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी महापालिका प्रशासन सरसावले आहे. यासाठी शहरात वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून बेवारस वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. या माध्यामातून आज दिवसभरात 17 दुचाकी व 8 चारचाकी बेवारस स्थितीत उभ्या असलेल्या भंगार वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली.

डॉ. विजय सूर्यवंशी, महापालिका आयुक्त

कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या भंगार आणि बेवारस दुचाकी चारचाकी गाड्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानंतर 5 डम्पर आणि 3 क्रेनच्या सहाय्याने वाहतूक पोलिसांनी ही धडक कारवाई सुरु केली आहे. कल्याण-डोंबिवली शहरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बेवारस आणि भंगार गाड्यांमुळे नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. या वाहनांमुळे लहान-मोठे अपघातही घडले आहेत. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही दिवसांपूर्वी कल्याणात आले होते. त्यावेळी त्यांनीही रस्त्याच्या सौंदर्यावर याचा परिणाम होत असल्याचे सांगत रस्त्यावरील भंगार वाहने हटवण्याबाबत निर्देश दिले होते.

त्यानंतर वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडण्यासाठी तसेच रस्त्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी केडीएमसीचे नवे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या भंगार आणि बेवारस दुचाकी चारचाकी गाड्यांवर कारवाईचे करण्याचे आदेश दिले होते. आयुक्ताच्या आदेशानंतर केडीएमसी आणि वाहतूक विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही धडक कारवाई सुरू केली आहे.

रत्याच्या बाजूला उभ्या असलेल्या भंगार आणि बेवारस गाड्यांना नोटीस लाऊन काही तासांचा अवधी देऊन या गाड्या उचलण्याचे काम आज दुपारी सुरु करण्यात आले. डम्पर आणि क्रेनच्या सहाय्याने वाहतूक पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील आणि प्रभाग अधिकारी सुहास गुप्ते यांनी कर्णिक रोडवर या कारवाईला सुरवात केली. या कारवाईत कल्याण पूर्व/पश्चिम विभागातील 17 दुचाकी व 8 चारचाकी बेवारस, भंगार वाहने डंम्पर व हायड्राक्रेनमार्फत उचलून आधारवाडी परिसरातील भूखंडावर नेऊन ठेवण्यात आली आहेत. तर उद्या डोंबिवलीत कारवाई करणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.