ETV Bharat / state

ठाणे: विनाकारण बाहेर पडणाऱ्या वाहनधारकांना पोलिसांनी परत पाठवले, महामार्गावर वाहतूक कोंडी - ठाणे वाहतूक कोंडी बातमी

मुंबईतून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या व ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. विनाकारण फिरणाऱ्या तसेच नियम मोडणाऱ्या वाहनाचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. यामुळे मुलुंड टोल नाक्याजवळ प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

वाहतूक कोंडी
वाहतूक कोंडी
author img

By

Published : Jun 29, 2020, 1:32 PM IST

ठाणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (दि. 28 जून) दिलेल्या आदेशानंतर वाहतूक पोलीस आणि शहर पोलिसांनी कडक नाकाबंदी केली आहे. विनाकारण फिरणाऱ्या, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहनांसाठी ठरवून दिलेल्या प्रवासी मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी नेणाऱ्यांना परत पाठविण्यात येत होते.

विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक काम असल्यास घराच्या केवळ दोन किलोमीटर परिसरातच जावे, अन्यथा अशा लोकांवर कारवाई होईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र, अनेकजण आपली वाहने रस्त्यावर काढत ठाण्यातून मुंबईच्या दिशेने निघाले होते. मात्र, मुंबई व ठाणे या दोन्ही जिल्ह्याच्या पोलिसांकडून वाहनांची व कागदपत्रांची तपासणी केली जात होती. यामध्ये ठरवून दिलेल्या प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करुन त्यांना परत पाठवले जात आहे.

अत्यावश्यक सेवेसाठीची कागदपत्रे किंवा जिल्ह्यात प्रवेश करण्याचा परवाना नसलेल्यांनाही पुन्हा माघारी पाठविण्यात येत आहे. यामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. सध्या पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडविण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 'या' मशिदीत सर्वधर्मीयांसाठी सेवा; मोफत ऑक्सिजन सेंटर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.