ETV Bharat / state

Tourists stuck at Mahuli Fort : माहुली गडावर 6 तास अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप वाचविण्यात यश - Tourists stuck at Mahuli Fort for 6 hours

ठाणे जिल्ह्यातील माउंट एवरेस्ट समजला जाणाऱ्या किल्ले माहुली गडावर ट्रेकिंग साठी ठाणे व नवी मुंबईतील ऐरोली येथून आलेल्या ११ पर्यटकांपैकी ४ पर्यटक गडावर दिशादर्शक सूचनाफलक नसल्यामुळे रस्ता चुकले होते. तब्बल ६ तास अडकून पडलेल्या (Tourists stuck at Mahuli Fort for 6 hours) पर्यटकांना सुखरूप गडाच्या पायथ्याशी घेऊन येण्यात यश (successfully rescued) आले आहे. Tourists stuck at Mahuli Fort

Tourists stuck at Mahuli Fort
किल्ले माहुली गड
author img

By

Published : Nov 1, 2022, 3:37 PM IST

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील माउंट एवरेस्ट समजला जाणाऱ्या किल्ले माहुली गडावर ट्रेकिंग साठी ठाणे व नवी मुंबईतील ऐरोली येथून आलेल्या ११ पर्यटकांपैकी ४ पर्यटक गडावर दिशादर्शक सूचनाफलक नसल्यामुळे रस्ता चुकले. त्यामुळे त्यांनी आडवाटेने गड उतरण्यास सुरुवात केली. त्यामध्ये दोन मुली आणि दोन मुलांचा समावेश होता. सदर घटनेची माहिती किल्ले माहुली गड प्रतिष्ठानचे संस्थापक महेश पितांबरे यांना मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जीवरक्षक रेस्क्यु टीम, वनविभाग व स्थानिक पोलीस गडावर दाखल झालेत आणि तब्बल ६ तास (Tourists stuck at Mahuli Fort for 6 hours) अडकून पडलेल्या पर्यटकांना सुखरूप गडाच्या पायथ्याशी घेऊन येण्यात त्यांना (successfully rescued) यश आले. Tourists stuck at Mahuli Fort

प्रतिक्रिया देतांना किल्ले माहुली गड प्रतिष्ठानचे संस्थापक महेश पितांबरे

शहापूर तालुक्यातील किल्ले माहुली गडावर ट्रेकिंगसाठी काल सकाळच्या सुमारास ठाणे व नवी मुंबईतील ऐरोली येथून ११ पर्यटकांचे पथक आले होते. त्यावेळी संबंधित पर्यटकांकडून वनविभागाने प्रत्येकी ३० रुपये अशी ३३० रुपये प्रवेश फी घेऊन त्यांना गडावर सोडले. मात्र वन अधीकारी एकीकडे पर्यटकांकडून फी वसुली करत असताना प्रवेश फी घेऊन सुद्धा गडावर दिशादर्शक सूचना फलक का नव्हते? असा सवाल उपस्थित झाला आहे. तर पर्यटकांना जर वेळेत वनविभागाची मदत मिळाली असतीस तर ते भटकले नसते. शिवाय त्यांच्या जीवाचं काही बर वाईट झालं असतं तर, त्याला जवाबदार कोण? असा प्रश्न किल्ले माहुली गड प्रतिष्ठान आणि शंभू दुर्ग प्रतिष्ठान कडून उपस्थित केला जातो आहे. वनविभागाने पर्यटकांच्या जीवनाशी खेळू नये अशी शिवभक्तांची मागणी असून; गरजेच्या सोयी उपलब्ध करुन देण्यात याव्यात, जेणेकरून अशी घटना पुन्हां घडणार नाही, अशी मागणी शिवभक्तांनी केली आहे.

याबाबत वन अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संर्पक होऊ शकला नाही. एकंदरीतच दिवाळीची सुट्टी असल्याने या ठिकाणी शेकडो पर्यटकांची गर्दी पहावयास मिळत असतानाच, एखादी दुर्घटना घडल्यावर वन विभागाला जाग येणार का? असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला आहे. Tourists stuck at Mahuli Fort

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.