ETV Bharat / state

ठाणे: जबरी घरफोडी करणाऱ्या तिघांना गोव्यातून अटक - ठाण्यातील आरोपी गोव्यात अटक

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या घरफोडी संदर्भात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २६ तोळे सोने, गुन्ह्यात वापरलेली गाडी असा ७ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जप्त मुद्देमाल
author img

By

Published : Nov 19, 2019, 7:41 PM IST

ठाणे - खोपट परिसरात राहणाऱ्या करुणा संदीप ठाणगे यांच्या घरातील ३६ तोळे सोने अज्ञात चोरटयांनी लांबवले. ही घटना २३ ऑक्टोबरला घडली होती. याबाबत नौपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे तीन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून २६ तोळे सोने, गुन्ह्यात वापरलेली गाडी असा ७ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जबरी घरफोडी करणाऱ्या तिघांना गोव्यातून अटक

२३ ऑक्टोबरला चोरी झाल्यानंतर पोलिसांच्या हाती कुठलाच पुरावा नव्हता. पोलिसांनी फिर्यादी ठाणगे राहत असलेल्या परिसरातील सीसीटीव्हींची तपासणी केली. त्यातून पोलिसांना घरफोडी करणाऱ्या आरोपींची ओळख पटली. सीसीटीव्हीच्या चित्रीकरणात दिसणारे आरोपी बाबू जमालुद्दीन खान (रा. गोवंडी), संजय रत्ना कांबळे (रा. दिवा, ठाणे), दत्ताराम इंगळे (रा. गोवंडी) या तिघांना पोलिसांनी अटक केली.

हेही वाचा - माजी मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात याचिका करणाऱ्याला न्यायालयाने ठोठावला 2 लाखांचा दंड

मोबाईल फोनच्या लोकेशनच्या आधारे तांत्रिक तपास करून ठाणे पोलिसांनी गोव्यातून या आरोपींना अटक केली. आरोपी बाबू खान आणि संजय कांबळे यांना ७ नोव्हेंबरला गोव्यातून अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे दयाराम इंगळे याला ८ नोव्हेंबरला अटक करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Intro:रेकी करीत ३६ तोळे सोने घेऊन पोबारा करणाऱ्या तिघा आरोपीना गोव्यातून अटक
सीसीटीव्ही पुतेज आणि मोबाईल लोकेशनच्या दहरे आरोपी गजाआडBody:

ठाण्याच्या खोपट परिसरात राहणाऱ्या फिर्यादी करुणा संदीप ठाणगे यांच्या घरातील असलेले ३६ तोळे सोने अज्ञात चोरटयांनी घरफोडूं लांबवीले. हि घटना २३/१०/२०१९ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ६-३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुहा नोंदविण्यात आला. नौपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही पुटेजच्या आधारवर तीन आरोपीना तब्बल २६ तोळे सोने, गुन्ह्यात वापरलेली गाडी असा ७ लाख ८० हजाराच्या मुद्देमालासह अटक केली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या हातात कुठलाच पुरावा नसताना पोलिसांनी आसपासच्या सीसीटीव्हीची तपासणी केली. त्यात घरफोड्यांची माहिती पोलिसांच्या हाताला लागली. पोलिसांनी सीसीटीव्ही पुटेज , सीसीटीव्हीत दिसणारे आरोपी बाबू जमालुद्दीन खान रा. गोवंडी. संजय रत्ना कांबळे रा. दिवा ठाणे, आणि दत्ताराम इंगळे रा. गोवंडी मुंबई या तिघांना अटक केली. पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक तपस करून आरोपींच्या मोबाईलच्या लोकेशनच्या टॉवरच्या लोकेशनच्या आधारे पोलीस गोव्यात पोहचले. त्यांनी आरोपी बाबू खान आणि संजय कांबळे याना गोव्यातून ७ नोव्हेंबर रोजी अटक केली. त्यानंतर दयाराम इंगळे याला ८ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी अटक केली. अटक आरोपींच्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून ३६ तोळे सोने चोरून नेले त्यापैकी २६ तोळे सोने आणि गुन्ह्यात वापरलेली होंडा एसेन्ट गाडीसह लाख ८० हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला.
ByteConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.