ठाणे: सरुउद्दीन ताजउद्दीन शेख (वय ३२, रा. अमृतनगर, शादीमहल रोड, मुंब्रा), जुबेर जलील अन्सारी (वय २६ रा. दारुखाना झोपडपटटी, शिवडी मुंबई), शहाबुद्दीन ताजउद्दीन शेख (वय ३२, रा. अमृतनगर, शादीमहल रोड, मुंब्रा) असे अटक केलेल्या सराईत चोरट्यांची नावे आहेत. कल्याण पश्चिम भागात राहणारे रविंद्र शेट्टी (वय ६३) यांचे डोंबिवली पूर्वेकडे स्टेशनजवळ डिलक्स वाईन शॉप नावाचे दारू विक्रीचे दुकान आहे. ११ जून रोजी रविवारी रात्री दुकान बंद केल्यानंतर १२ जूनला मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे मुख्य शटर लोखंडी कटावणीने उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानाच्या तिजोरीतील आठ लाख रुपयांची दैनंदिन व्यवहारातील रक्कम या चोरट्यांनी पळवून नेली.
या पथकाने केला तपास: त्यानंतर दुकान मालक रविंद्र शेट्टी हे जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले तेव्हा त्यांना दुकानात चोरी झाल्याचे आढळून आले. हा प्रकार कळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. दुकान मालक रविंद्र शेट्टी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत भराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप, हवालदार पी. के. भणगे, विशाल वाघ, नितीन सांगळे, शिवाजी राठोड, निसार पिंजारी, कोळेकर, लोखंडे यांचे विशेष तपास पथक तयार केले. पोलिसांनी वाईन शाॅप परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. तीन चोरट्यांनी ही चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
तांत्रिक माहितीच्या आधारे अटक: पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून तांत्रिक माहितीच्या आधारे मुंब्य्रातील अमृतनगरमध्ये राहणारे सरूद्दीन ताजउद्दीन शेख, शहाबुद्दीन शेख आणि मुंबईतल्या शिवडी जवळील दारुखाना भागात राहणारा जुबेर जलील अन्सारी अशा तिघा बदमाशांना अटक केली. या तिन्ही चोरट्यांनी डोंबिवलीतील वाईन शॉप फोडल्याची कबूली दिली. या चोरट्यांकडून आतापर्यंत साडेतीन लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली. पोलिसांनी या तिन्ही चोरट्यांना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलीस कोठडी सुनावली.
सरूद्दीन-जुबेरवर गुन्ह्यांची मालिका: यातील सरूद्दीनवर मुंबई व ठाणे परिसरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांतून 15 घरफोडीचे, तर जुबेरवर 14 गुन्हे दाखल आहेत. या व्यतिरिक्त या चोरट्यांनी किती ठिकाणी चोऱ्या आणि घरफोड्या केल्या आहेत. याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर करत आहेत.
हेही वाचा:
- Mobile Thief Arrested: इराणी गँगच्या २४ वर्षीय म्होरक्यांवर २१ गुन्हे, मोबाईल चोरीच्या आरोपात सापळा रचून अटक
- Mother Beat Child : जन्मदात्या आईनेच चटके देत गरम तव्यावर बसवले, तीन भांवंडांची सुटका
- Ratnagiri Crime News: बॉम्ब तयार करणारे रॅकेट? पालगडमध्ये माथेफिरूकडून तब्बल 20 गावठी बॉम्ब जप्त, दापोली पोलिसांची कारवाई