ETV Bharat / state

MD Drugs Seized: अंमली पदार्थ एमडी पावडरसह तीन आरोपी गजाआड; पाडव्याच्या मुहूर्तावर कारवाई - डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे येथे पाडव्याच्या मुहूर्तावर कारवाई करण्यात आली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून आरोपी कमरूजमान गुलाम मोहम्मद शेख उर्फ कमर(२०) याला विपुल लॉज दहिसर मोरी येथून अटक केली. त्याच्याकडून पोलीस पथकाने ५५ ग्राम ३ मिलीग्राम एमडी पावडर हस्तगत केली आहे.

MD Drugs Seized
एमडी पावडरसह तीन आरोपी गजाआड
author img

By

Published : Mar 22, 2023, 7:27 AM IST

अंमलीपदार्थ एमडी पावडरसह तीन आरोपी गजाआड

ठाणे: गोपनीय माहितीच्या आधारे अंमली विरोधी पथकाचे पोलीस हवालदार शिवाजी गणपती वासरवाड याना खबऱ्याने माहिती दिली होती.त्यावेळी सापळा रचून आरोपीला पकडण्यात आले. एमडी पावडरची बाजारात २ लाख ३५ हजार रुपये एवढी किंमत आहे. पोलीसांनी आरोपीच्या विरोधात डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आरोपीच्या चौकशीत पोलीस पथकाने मोहम्मद शरीफ अब्दुल हाफिज शेख, उर्फ पापा व आणखीन दोन आरोपीना बेड्या ठोकून एकूण १० लाख ५२ हजार ३८० रुपये किंमतीचे १२६.७७ ग्राम एमडी हस्तगत केले आहे.

६० ग्रॅम एमडी जप्त: अटक आरोपी कमरूजमान गुलाम मोहम्मद शेख उर्फ कमर(२०) रा. रूम नं. ०५ बसेरा चाळ, ठाणे. हा अंमली पदार्थ जवळ बाळगून विपुल लॉज समोरील मुन्ना पनवेल रोड, दहीसर मोरी गाव, ठाणे येथे फिरत असताना सापळा रचलेल्या पोलीस पथकाने आरोपीला अटक केली. त्यांच्या अंगझडतीत ५५ ग्राम ३ ग्राम एमडी पोलीसांना आढळली. त्याने चौकशीत सदरची एमडी पावडर मोहम्मद शरीफ अब्दुल हाफिज शेख उर्फ पापा याचे नाव सांगताच पोलिसांनी रूम नं. २०१ ए विंग, जैतुनबाग, शिमला पार्क, कौसा मुंब्रा ठाणे येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून ६० ग्रॅम एमडी जप्त केला. दरम्यान अटक आरोपीकडे चौकशीत आरोपी वसीम अन्वर बाज उर्फ लाला (२७) रा. ८०१ सी विंग, जस्मिन बिल्डिंग, लोढा काऊन, खोनीगाव ता-कल्याण हे नाव पुढे आले. पोलीस पथकाने आरोपीच्या माहितीवरून वसीम अन्वर याला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडे ११.७४ ग्राम एमडी सापडले. अमली पदार्थ विरोधी पथकाच्या धडक कारवाईत पोलीसांनी विक्रीची चैन मधील तीन आरोपीना अटक करून, १० लाख ५२ हजार ३८० रुपयांचा १२६ ग्राम आणि ७७ मिलीग्राम एमडी पावडर हस्तगत करण्यात यश मिळवले.

प्लांट उघडण्याचा होता विचार : अटक केलेला आरोपींकडून मिळालेले माहितीनुसार, डीआरआयने केलेल्या कारवाईमध्ये देखील एक आरोपी वॉन्टेड असल्याचे समोर आले आहे. या आरोपीने महाराष्ट्रात आणि हैदराबाद येथे एमडी बनवण्याचा प्लान टाकण्याची तयारी देखील सुरू होती. त्यासाठी लागणारे साधनसामग्री विकत घेऊन लवकरच प्लांट देखील टाकला जाणार होते. त्याआधीच पोलीसांनी मुसक्या वळल्यामुळे अमली पदार्थ बनवण्याचा प्लांट तयार झाला नाही.

हेही वाचा: Thane Crime News नवी मुंबईतील त्या बिल्डरच्या खून प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.