ठाणे : दोन वर्षानंतर ठाण्यातील मुख्य आकर्षण असणारी दिवाळी पहाट कार्यक्रम (Diwali Pahat 2022) यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बाळासाहेबांचे शिवसेना या गटामार्फत ठाण्यातील तलाव पाळी या ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले (Thousands of youth participated Diwali Pahat) होते.
आगळीवेगळी दिवाळी पहाट : शिवसेनेत फूट पडल्याने स्वतंत्र दोन गट झाल्यानंतर ही दिवाळी पहाट एकदम आगळीवेगळी होती. कारण शिवसेनेचे ठाणे असे म्हटले जाणाऱ्या याच ठाण्यामध्ये दोन गट निर्माण झालेले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे खासदार राजन विचारे यांनी देखील याच ठिकाणी यावेळेला दिवाळी पहाटेचे आयोजन केले आले (youth participated Diwali Pahat) होते.
मुख्यमंत्री आमंत्रित : तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेबांची शिवसेना या शिवसेनेकडून देखील मोठ्या प्रमाणात दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले (Diwali Pahat in Thane) होते. मुख्य म्हणजे या सर्वच दिवाळी पहाटमध्ये या मुख्य आकर्षण होते- ते म्हणजे सेलिब्रिटींची रेलचेल. दोन्ही कार्यक्रमांमध्ये शक्ती प्रदर्शनासाठी किंवा तरुणाईला आकर्षित करण्यासाठी सेलिब्रिटींना बोलवण्यात आले होते. तर बाळासाहेबांची शिवसेना या गटाकडून थेट मुख्यमंत्र्यांनाच आमंत्रित करण्यात आले होते. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सर्वांशी संवाद साधला आणि ठाण्यामध्ये आयोजित सर्वच दिवाळी पहाट या कार्यक्रमाला त्यांनी भेटी (Diwali Pahat organized by three political parties) दिल्या.
ठाण्यात तरुणाई उतरली रस्त्यावर : ठाण्यातील मासुंदा तलाव भागात दरवर्षी दिवाळी पहाट निमित्ताने हजारो युवक युवती विध्यार्थी जल्लोष साजरा करतात. याची सुरवात नितीन लांडगे यांनी केल्यानंतर यंदा राजन विचारे गटाने ही कार्यक्रमाची परवानगी मगितली होती. हे दोन्ही गट भीडतील म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला (Police arrangements) होता.