ETV Bharat / state

कोरोना प्रतिबंधक लसी समजून चोरट्यांनी मारला पोलिओ लसीवर डल्ला - Thane breaking news

सध्या कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा जाणवत आहे. असे असताना अंबरनाथ तालुक्यातील मांगरुळ आरोग्य केंद्रातील कोरोना प्रतिबंध लस समजून चोरट्यांनी पोलिओची लस लांबविल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. या प्ररकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लस
लस
author img

By

Published : May 24, 2021, 6:59 PM IST

ठाणे - एकीकडे कोरोना प्रतिबंधक लसीचा तुडवडा जाणत असताना कोरोनाच्या लसी समजून पोलिओच्या लसीवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ आरोग्य केंद्रामध्ये समोर आली आहे. रविवारी (दि. 23 मे) मध्यरात्रीच्या सुमारास आरोग्य केंद्राच्या खिडकीच्या ग्रील तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत चोरी केली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मांगरूळच्या या आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. मात्र, आरोग्य केंद्रात लस नसल्याने चोरट्यांनी पोलिओच्या लसी लंपास केल्या. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

फ्रिजमध्ये असलेल्या पोलिओच्या लस चोरट्यांच्या हाती

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी मांगरूळ आरोग्य केंद्रात सुरुवात करण्यात आली आहे. या रुग्णालयात दररोज सकाळी बदलापूर येथून कोरोना प्रतिबंधक लसी येत असतात. मात्र, रविवारी मध्य रात्रीच्या सुमारास लस रुग्णालयात असतील या आशेने चोरट्यांनी रुग्णालयात प्रवेश केला होता. रुग्णालयात प्रवेश केल्यानंतर रुग्णालयातील फ्रिजमध्ये असलेल्या पोलिओच्या लस चोरट्यांच्या हाती लागल्या आणि त्यांनी त्याच घेऊन रुग्णालयातून पोबारा केला आहे. मात्र, सोमवारी सकाळी आरोग्य केंद्रामधील अधिकाऱ्यांनी रुग्णालयात प्रवेश केला असता, रुग्णालयातील फ्रिजमध्ये पोलिओच्या लसी नसल्याचे समोर आले आहे.

लसीसह सीसीटीव्हीचा मॉनिटरही पळविला

या प्रकरणी आज (दि. 24 मे) सकाळी रुग्णालय प्रशासनाने उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी घटनासाठी धाव घेत पंचनामा केला आहे. मात्र, आता पोलिसांसमोर लसी पळविणाऱ्या मुसक्या आवळण्याचे आव्हान असणार आहे. तर रुग्णालयात असलेल्या बंद सीसीटीव्हीचा मॉनिटरही चोरट्यांनी लंपास केला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी असलेले मांगरूळ आरोग्य केंद्र सध्या शेवटच्या घटका मोजत आहे. पोलिसांनीही या रुग्णालयाच्या सुरक्षिततेकडे लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा - चिमुरड्यांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या महिलेस रंगेहात अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.