नवी मुंबई - महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील मनी लाँडरिंग प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याची तळोजा कारागृहात चौकशी करण्याची परवानगी विशेष पीएमएलए न्यायालयाने गुरुवारी ईडीला दिली होती. त्यानुसार ईडीच्या माध्यमातून 9 जुलैला वाझे यांची चौकशी करण्यात येणार होती. मात्र ही चौकशी 10 जुलैला करण्यात येणार असल्याचे कळले. मात्र 10 जुलैला देखील ईडीच्या माध्यमातून चौकशी झाली नसल्याची माहिती तळोजा जेल प्रशासनाच्या माध्यमातून मिळाली आहे. सचिन वाझे यांची चौकशी झाल्यानंतर महाआघाडीचे कित्येक नेते अडचणीत येणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
सचिन वाझे तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत -
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील मनी लाँडरिंगच्या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची तळोजा कारागृहात चौकशी करण्याची परवानगी विशेष पीएमएलए न्यायालयाने गुरुवारी ईडीला दिली. सचिन वाझे हे सध्या अँटिलिया विस्फोटके व मनसुख हिरन हत्या प्रकरणात नवी मुंबईती जवळील तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
न्यायालयाने तळोजा कारागृहात जााऊन चौकशी करण्याची दिली ईडीला परवानगी -
ईडीने गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे व स्वीय सहायक कुंदन शिंदे यांना अटक केल्यानंतर त्यांची चौकशी केली होती. सचिन वाझेंनी मुंबईतील ऑर्केस्ट्रा बामालकांकडून चार कोटी 70लाख रुपये वसूल करून दोन हप्त्यांमध्ये कुंदन शिंदे यांच्याकडे दिले होते, अशी कबुली कुंदन शिंदे व संजीव पलांडे यांनी दिल्याचा दावा ईडीने केला आहे. त्याअनुषंगाने वाझेंची चौकशी करायची असल्याने तळोजा कारागृहात जाऊन त्यांची चौकशी करण्याची परवानगी द्यावी, असा विनंती अर्ज ईडीने केला होता. तो अर्ज न्यायालयाने मान्य केला.
सचिन वाझे यांची ईडीच्या माध्यमातून चौकशी झाली नाही -
9 जुलैला ईडीच्या माध्यमातून तळोजा कारागृहात जाऊन चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. मात्र ही चौकशी पुढे ढकलली व 10 जुलैला होणार असल्याची माहिती मिळाली. मात्र 10 जुलैला देखील ईडीच्या माध्यमातून तळोजा कारागृहात सचिन वाजे यांची चौकशी झाली नसल्याचे व ईडीचे पथक आले नसल्याची माहिती तळोजा कारागृहाचे जेलर कौस्तुभ कुर्लेकर यांनी दिली आहे.
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची तळोजा कारागृहात आजही ईडी चौकशी नाही.. - बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील मनी लाँडरिंग प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याची तळोजा कारागृहात चौकशी करण्याची परवानगी विशेष पीएमएलए न्यायालयाने गुरुवारी ईडीला दिली होती. मात्र दोन दिवसांनंतरही वाझे यांची चौकशी झालेली नाही.