ETV Bharat / state

Bhatsa River: भातसा नदीचा पुल गेला पाण्याखाली; गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

author img

By

Published : Jul 15, 2022, 7:25 PM IST

कल्याण तालुक्यातील वालकस बेहरे गावात बाराशे लोकवस्ती आहे. या गावात येण्या-जाण्याच्या मार्गावर भातसा नदी असून त्यावर पूल उभारण्यात आला. मात्र, हा गेल्या पाच दिवसांपासून पुराच्या पाण्याखाली गेल्याने ग्रामस्थांचा शहराशी संपर्क तुटला आहे. तर, काही गावकरी जीव मुठीत घेऊन पुलावरील पाण्याच्या प्रवाह मधून वाट काढत गाव सोडत आहे. विशेष म्हणजे येथील ग्रामस्थांनी शासन दरबारी अनेक वर्षांपासून पाठवुरावा केला. मात्र, रस्त्याच्या मागणीची काही पूर्तता झाली नाही. आजही येथून प्रवास करताना मोठे हाल सहन करावे लागत आहेत.

भातसा नदी
भातसा नदी

ठाणे - कल्याण तालुक्यातील वालकस बेहरे गावाजवळ असलेल्या भिवंडी आणि वाशिंद शहराला जोडले आहे. याच शहरात जाण्यासाठी गावकऱ्यांना ५० वर्षांपूर्वी भातसा नदीवर पूल उभारण्यात आला. मात्र, ५० वर्षे जुना कमकुवत पूल पाण्याखाली गेला असून रहदारीचा पर्याय पूर्णपणे बंद आहे. अशावेळी वालकस बेहरे व मठाची वाडी येथील जवळपास १ हजार २०० नागरिकांची कोंडी झाली आहे. गावातून बाहेर पडण्यासाठी पर्यायी कल्याण-कसारा रेल्वे मार्गाचा उपयोग करावा लागत आहे. मात्र, ज्या मार्गाने जीवधोक्यात घालून रेल्वे रुळा शहरात जात आहे. त्यामुळे आतापर्यंत १४ निरपराध गावकऱ्यांचा रेल्वेच्या अपघात जीव गेला आहे.

भातसा नदीचा पुल गेला पाण्याखाली

गावकऱ्यांच्या जीवाला धोका - मागील वर्षी पावसाळ्यात पूल पाण्याखाली गेल्यानंतर गावातून बाहेर पडण्यासाठी रस्ता नसल्या कारणाने भगवान शंकर शेलार यांचा उपचाराअभावी दुर्दवी मृत्यू झाला होता. या गावात वयोवृद्ध व्यक्ती, गरोदर महिला, लहान मुले असताना त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून या वर्षीही एखादी निष्पाप व्यक्ती उपचाराअभावी आपला प्राण गमावते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. या गावात २५ विध्यार्थासह १५ ते २० कर्मचारी असून शाळकरी मुलांचे शिक्षणाचे नुकसान होत आहे. तर कर्मचारी कामावर जाऊ शकत नाहीत. अशी अस्वथा झाल्याची माहिती गावातील ग्रामस्थ चेतन कवाड यांनी दिली आहे.

पुल -रस्त्यासाठी निवडणूक कार्यक्रमांवर बहिष्कार - गेल्या चार वर्षांपासून गावातील तरुण आपल्या या जीवघेण्या प्रवासातून मुक्त होण्यासाठी खडवलीकडे जाणाऱ्या रस्त्याची मागणी शासन दरबारी करत आहेत. यासाठी गावकऱ्यांनी ग्रामपंचयातीपासून ते मंत्रालायापर्यंत प्रत्येक ठिकाणी निवेदनी दिली. मात्र, काही कार्यवाही होत नसल्याचे पाहून शासनाला झोपेतून जागे करण्यासाठी निवडणूक कार्यक्रमांवर बहिष्कारही टाकला होता. शिवाय सातत्याने जिल्हाधिकारी व प्रांत अधिकारी यासकडे पाठपुरावा करत भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न केला. परंतु, शासनाचे अधिकारी केवळ आश्वासन देत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे.

संसार घेऊन शासनाच्या दालनात पावसाळा संपेपर्यंत वास्तव्य - भातसा नदीवरील पूल यंदाच्या पावसाळ्यात महिन्याभरात चौथ्यांदा पाण्याखाली गेला आहे. अशावेळी सर्व गावकरी संतप्त असून, आपला पूर्ण संसार घेऊन शासनाच्या दालनात पावसाळा संपेपर्यंत वास्तव्य करण्याच्या तयारीत असल्याचे गावातील एका महिलेने संतप्त प्रतिक्रया दिली आहे.

हेही वाचा - Monsoon Update Maharashtra : राज्यात येत्या काळात पावसाचा जोर ओसरेल - डॉ. रामचंद्र साबळे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.