ETV Bharat / state

लवकरच सुरू होणार नाट्यगृह आणि सिनेमागृह; उर्मिला मातोंडकरांनी व्यक्त केला विश्वास - उर्मिला मातोंडकर

ठाण्यात विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित मंगळा गौर कार्यक्रमात उर्मिला मातोंडकर या उपस्थित झाल्या होत्या. यावेळी त्यांनी आदिवासी महिलांसोबत आदिवासी लोकनृत्यावर ठेका धरला. यावेळी शिवसेना नगरसेविका परिषा सरनाईक या देखील होत्या. आदिवासी नृत्यावर ठेका धरल्यानंतर उपस्थितांसाठी त्यांनी यावेळी लावणीच्या दोन ओळी देखील गाऊन सर्वांची मन जिंकली.

लवकरच सुरू होणार नाट्यगृह आणि सिनेमागृह
लवकरच सुरू होणार नाट्यगृह आणि सिनेमागृह
author img

By

Published : Aug 21, 2021, 7:45 AM IST

ठाणे - कोरोनाकाळात मराठी कलाकार, लोक कलावंत, नाट्यकर्मी यांचं मोठं नुकसान झालं असुन अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. एक कलाकार म्हणून हि खुप मोठी शोकांतिका आहे. नाट्यगृह आणि चित्रपटगृह लवकरात लवकर सुरु व्हावे मात्र कोरोनाकाळात बंद खोलीत एकत्रित येण धोक्याचे असल्याने ते अद्यापही सुरु करण्यासाठी वेळ लागतोय. पण लवकरच ते देखील सुरु करण्याचा निर्णय येणार असल्याचे अभिनेत्री आणि शिवसेना महिला उपनेत्या उर्मिला मातोंडकर यांनी सांगितले.

ठाण्यात विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित मंगळा गौर कार्यक्रमात उर्मिला मातोंडकर या उपस्थित झाल्या होत्या. यावेळी त्यांनी आदिवासी महिलांसोबत आदिवासी लोकनृत्यावर ठेका धरला. यावेळी शिवसेना नगरसेविका परिषा सरनाईक या देखील होत्या. आदिवासी नृत्यावर ठेका धरल्यानंतर उपस्थितांसाठी त्यांनी यावेळी लावणीच्या दोन ओळी देखील गाऊन सर्वांची मन जिंकली.

लवकरच नाट्यगृह सिनेमागृह सुरू

यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना चित्रपटगृह, नाट्यगृह अद्यापही बंद असल्याबाबत विचारले असता एक कलाकार म्हणुन माझ्यासाठी खुप मोठी शोकांतिका आहे. मात्र लवकरात लवकर ते देखील सुरु होईल असे मातोंडकर यांनी सांगितले. तसेच संस्कृती, लोककला, पारंपरिक कला टिकून राहावी यासाठी राज्य शासन नवीन योजना आणण्याच्या प्रयत्नात आहे आणि मी त्या समितीवर आहे. म्हणुन लवकरच प्रयत्न केले जाणार असल्याचे मातोंडकर यांनी सांगितले. आमदारकीबाबत त्यांना विचारले असता त्यांनी मी देखील त्याचीच वाट बघत असल्याचे हसत सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.